Shani Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. शनीची (Lord Shani) ज्या राशीवर साडेसाती सुरु होते त्या राशींसाठी तो काळ फार आव्हानात्मक आणि संकटांचा असतो. तसेच, शनीचा प्रवाह देखील संथ गतीने असल्यामुळे ढैय्या असो, साडेसाती वा महादशेचा परिणाम दीर्घ काळ टिकणारा असतो. त्यामुळेच प्रत्येक जण शनीच्या वाईट परिणामांना घाबरतात. तसेच, दिवाळीनंतर शनी मार्गी होणार आहेत. त्यामुळे 3 राशींसाठी (Zodiac Signs) हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. 


दिवाळीनंतर शनी बदलणार चाल 


पंचांगानुसार, 31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. दिवाळीनंतर बरोबर 15 दिवसांनी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2024 रोजी शनी मार्गी करणार आहे. शनी सध्या कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी कुंभ राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे शनी स्वराशीत वक्री होणार आहे. शनीचं हे संक्रमण सर्व 12 राशींवर परिणाम करणार आहे. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण हे नुकसानकारक असणार असण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. तुम्ही फार मेहनत करुनही तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं मार्गी होणं फार कठीण ठरु शकतं. या राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात. या काळात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दुरावू शकता. तुम्हाला करिअरमध्ये अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. 


मीन रास (Pisces Horoscope)


शनीच्या मार्गी होण्याचा प्रभाव तुमच्या करिअर, लव्ह लाईफवर देखील पडणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या करिअरवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सावध राहा. कोणावरही विश्वास ठेवू नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology Panchang 12 October 2024 : विजयादशमीच्या मुहूर्तावर जुळून आला रवि योगाचा शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश