Shani Dhaiyya 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीचा (Lord Shani) प्रभाव सर्व राशींवर होतो. शनी (Shani Dev) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यानुसार, शनीच्या ढैय्याचा काळ हा अडीच वर्षांचा असतो. जेव्हा शनी एखाद्या राशीच्या चौथ्या किंवा आठव्या चरणात असतात. तेव्हा तो काळ शनीच्या ढैय्याचा काळ मानला जातो.
सध्या न्यायदेवता शनी कर्क आणि वृश्चिक राशीत विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनीच्या ढैय्याचा प्रभाव सुरु आहे. पण, 29 मार्चनंतर या दोन राशींना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळणार आहे.
शनीच्या ढैय्याच्या कालावधीत अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. विशेषत: ढैय्याचा सर्वाधिक प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर आणि शारीरिक समस्यांवर होतो. त्यामुळे या सगळ्याचा सामना त्या त्या राशींना करावा लागतो. पण, 2025 मध्ये शनीने 29 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करताच दोन राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
ज्या राशींच्या लोकांवर 2025 मध्ये शनीचा प्रभाव नसणार आहे अशा राशींमध्ये सर्वात पहिल्या क्रमांक लागतो तो कर्क राशीचा. यावर्षी शनीच्या ढैय्याचा परिणाम कर्क राशीवर नसणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील. तसेच, तुमचं आरोग्यही निरोगी राहील. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमची आर्थिक स्थितीदेखील चांगली राहील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना देखील या वर्षी शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या मानसिक समस्या दूर होऊ शकतील. या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमचं बॅंक बॅलेन्स वाढेल. या काळात तुम्ही नवीन प्रॉपर्टी देखील खरेदी करु शकता. त्यामुळे तुम्हाला कशाचीच चिंता भासणार नाही. जर तुमचीसुद्धा रास या दोन राशींपैकी एक आहे तर तुमच्यासाठी 2025 वर्ष अगदी आनंदात जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :