Shani Dev : ज्योतिष शास्त्राप्रमाणे, कर्मफळदाता शनी (Lord Shani) लवकरच राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर (Diwali 2024) काही राशींसाठी हा काळ सर्वात कठीण काळ ठरु शकतो. प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. शनी (Shani Dev) सध्या आपली स्वराशी म्हणजेच कुंभ राशीत स्थित आहेत. कुंभ राशीत शनी 29 जून 2024 रोजी वक्री झाले होते. यावर्षी दिवाळीनंतर शनी वक्रीपासून मार्गी होणार आहेत. 


आपल्याला माहीतच आहे की, शनी 15 नोव्हेंबर 2024 रोजी शुक्रवारी मार्गी झाले होते. त्यामुळे दिवाळीनंतर काही राशीच्या लोकांचं नशीब बदलू शकतं. तर काही राशींना अलर्ट राहण्याची गरज आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी दिवाळीच्या 15 दिवसांनंतरचा काळ फार कठीण ठरु शकतो. या दरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या कुटुंबात या काळात वादविवाद होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही शांत राहण्याची गरज आहे. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांनी दिवाळीनंतर 15 दिवसांनंतर शनीच्या मार्गी होण्याने सावधान राहण्याची गरज आहे. या काळात तुम्ही एखाद्या अडचणीत येऊ शकता. कुटुंबियांच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही जे काही कृत्य कराल त्याकडे सावध राहा. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांनी 15 नोव्हेंबरनंतर सर्वात कठीण काळ सुरु होणार आहे. या काळात तुम्ही सावधान आणि सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या काळात तुमच्या लव्ह लाईफमध्ये अनेक अजचणी येऊ शकतात. तुमचे गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे नात्याला थोडा वेळ द्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :                                       


Diwali Padwa 2024 Wishes : दिवाळी पाडव्यानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या हार्दिक शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश