Astrology : आज शनिवारचा दिवस हा अनेक अर्थांनी खास असणार आहे. आज कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी सिद्धी योग (Yog), शश योग आणि पुनर्वसु नक्षत्र असे शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा 5 राशींना चांगला लाभ होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही व्यवसायाशी संबंधित मोठी डील फायनल करु शकता. आज शनिवार असल्या कारणाने कोणत्या राशींवर शनीची शुभ दृष्टी असेल. तसेच, या 5 लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या पाठी शनीदेवाचा आशीर्वाद असल्या कारणाने तुम्हाला कोणतीच चिंता करण्याची गरज नाही. या काळात तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. तसेच, मित्रांच्या सहयोगाने देखील तुमची अनेक कामे पूर्ण होतील. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी लकी ठरु शकतो. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फार फलदायी असणार आहे. तुम्हाला भावा-बहि‍णींचा पाठिंबा असल्या कारणाने तुम्ही नवनवीन प्रयोग करुन पाहू शकता. तसेच, तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ दिसून येईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. 


तूळ रास (Libra Horoscope)


ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फार सकारात्मक परिणाम घेऊन येणारा असणार आहे. या काळात उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. व्यापारात नवीन योजनांचा तुम्ही वापर करु शकता. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न सहज पूर्ण करु शकता. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी तुम्ही मन लावून काम कराल. भविष्यासाठी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. मात्र, कोणालाही पैसे देताना घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. शनीदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असल्या कारणाने तुम्ही निश्चिंत असाल. तसेच, जर तुम्हाला नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. तुमच्या कामाने तुम्ही इतरांचा विश्वास जिंकाल. तसेच, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जास्त असल्या कारणाने तुमच्या मतावर, निर्णयावर तुम्ही ठाम असाल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 03 August 2024 : आज शनीचा वार शनिवार! कोणाला मिळणार लाभ तर कोणाला होणार तोटा? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य