Horoscope Today 03 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 


मेष रास (Aries Today Horoscope)


नोकरी (Job) - आज तुम्ही कामाच्या ठिकाणी पूर्णपणे सक्रिय होऊन काम कराल. तुमच्या कामाप्रती असलेल्या उत्साहाला पाहून तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईल.


व्यापार (Business) - आज तुमच्या कामाचा तुम्ही जास्त प्रचार करायला हवा. तरच, तुमचा व्यवसाय जोमाने पुढे नेता येईल. 


तरूण (Youth) - जे तरूण युवक आहेत ते आपलं कार्य पुढे नेण्यासाठी सक्षम असतील. तरच, तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करू शकता. 


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


नोकरी (Job) - आजच्या दिवशी असं कोणतंच काम करू नका ज्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. 


व्यापार (Business) - आज तुमची रखडलेली जी काही कामं असतील तर ती वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.


तरूण (Youth) - आज तुमचे भरपूर पैसे खर्च होऊ शकतात. तुमच्या पार्टनरवर तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता. यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. 


आरोग्य (Health) - आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार आळस आणि थकवा येऊ शकतो. यामुळे तुमची कामं कदाचित पूर्ण होणार नाहीत. 


व्यापार (Business) - आज व्यापाराच्या ठिकाणी कोणाबरोबरच उधारीचा व्यवहार करू नका. तुमचे पैसे काढून घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.


तरूण (Youth) - आज भावा-बहिणीबरोबर तुमचे चांगले सलोख्याचे संबंध राहतील. यावेळी चुकूनही चिडचिड करू नका.


आरोग्य (Health) - आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे. 


कर्क रास (Cancer Today Horoscope) 


नोकरी (Job) - कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित लोकांना पगारवाढीबाबत आनंदाची बातमी मिळू शकते.


व्यवसाय (Business) - तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला तुमची मार्केटिंग टीम वाढवावी लागेल. व्यापारी आणि व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे.


विद्यार्थी (Student) - यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच मेहनत सुरू करावी.


आरोग्य (Health) - आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज जास्त ताण घेऊ नका.


सिंह रास (Leo Today Horoscope) 


नोकरी (Job) - आज तुम्हाला संघाचं नेतृत्व करण्यास सांगितलं जाऊ शकतं. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी दिलेल्या जबाबदाऱ्यांबाबत गांभीर्य ठेवावं लागेल.


व्यवसाय (Business) - व्यवसायात उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवासासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल.


विद्यार्थी (Student) - एमबीए आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी वेळेवर त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देतील, तरच ते त्यांचं भविष्य चांगले घडवू शकतात. 


आरोग्य (Health) - आरोग्याच्या दृष्टीकोनातून तुमचा दिवस चांगला जाईल. पण तरीही तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं चांगलं राहील. 


कन्या रास (Virgo Today Horoscope) 


नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, कामाच्या ठिकाणी तुम्ही अनावश्यक वाद आणि चर्चेपासून स्वतःला दूर राहा आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा नुकसान सहन करावं लागेल.


व्यवसाय (Business) - व्यवसायातील स्पर्धेमुळे तुम्हाला तुमच्या उत्पादनांच्या किमती कमी कराव्या लागतील. 


विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल सांगायचे तर, परीक्षेची तारीख अचानक जाहीर झाल्यामुळे तुमचं टेन्शन वाढेल. 


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, डिहायड्रेशनच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, यावेळी जास्त पाणी प्या.


तूळ रास (Libra Today Horoscope) 


नोकरी (Job) - आज कोणत्याच प्रकारचा ताण किंवा थकवा जाणवू देऊ नका. तुमची दिवसभरातील सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 


आरोग्य (Health) - आज तुमचा ब्लड शुगर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी थोडं वर्कआऊट, योगा, मेडिटेशन करायला सुरुवात करा. 


व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना आज चांगला नफा मिळू शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 


युवक (Youth) - जोडीदाराबरोबरचा तुमचा आजचा दिवस मस्त, मजेत आणि आनंदात जाणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)


नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमची कामं वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्हाला भरपूर वेळ लागू शकतो. 


आरोग्य (Health) - तुमच्या वाढत्या वजनाला पाहून तुम्हाला सतत चिंता जाणवू शकते. यामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. 


व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाची प्रगती काहीशी हळू असेल. पण यामुळे तुम्ही खचून जाऊ शकता. पण, मनात नकारात्मक भावना आणू नका. 


कुटुंब (Family) - आज तुमच्या कुटुंबियांचा कल धार्मिकतेकडे वळेल. प्रवासाच्या यात्रेला देखील जाण्याची शक्यता आहे. 


धनु रास (Sagittarius Today Horoscope)


नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त मदत घ्याल. त्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो. 


आरोग्य (Health) - आज तुम्ही कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट देणारं काम करू नये. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. 


प्रेमसंबंध (Relationship) - आज तुमचं मन एखाद्याच्या आठवणीत रमू शकतं. तुम्हाला रडू देखील येऊ शकतं. 


कुटुंब (Family) - आज संध्याकाळी तुमच्या घरात पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. अनपेक्षित शुभवार्ता तुम्हाला मिळू शकते. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा इतरांशी व्यवहार चांगला असणार आहे. तुमचा बॉस तुमच्या कामगिरीवर प्रसन्न असेल. 


व्यापार (Business) - आज तुम्ही व्यवसायात ज्या नवीन वस्तूंचा समावेश कराल त्याची चांगली विक्री होईल. तुम्हाला चांगला नफा मिळेल. 


तरूण (Youth) - आज तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकता. तसेच, त्या ठिकाणी महत्त्त्वपूर्ण माहिती गोळा करू शकता. 


आरोग्य (Health) - डोळ्यांसी दृष्टी अंधुक असल्या कारणाने तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो. त्यासाठी वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी फार सामान्य असणार आहे. एखादे काम पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. 


व्यापार (Business) - तुमचा व्यवसाय चांगला चालेल. फक्त कोणाला पैसे देताना सावधानता बाळगावी. 


तरूण (Youth) - तरूणांनी नोकरीच्या शोधात असताना बरोबर स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास करावा. यातून नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतील. 


आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य चांगलं असेल. पण, जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल.


मीन रास  (Pisces Horoscope Today)


नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती होईल. अनेकजण तुमच्या कामाचं कौतुक करतील. 


व्यापार (Business) - आज व्यावसायिक कामासाठी तुम्हाला जर कोणाची मदत हवी असेल तर ती तुम्हाला आज अगदी सहज मिळेल. 


तरूण (Youth) - घरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करायला शिका. अन्यथा यावरून तुम्हाला बोलणी खावी लागू शकतात. 


आरोग्य (Health) - वाढत्या उन्हापासून तुम्ही स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 03 August 2024 : आज 'या' राशींवर राहणार शनीदेवाची कृपा, मिळणार विशेष लाभ; वाचा आजचे राशीभविष्य