Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनीला (Shani Dev) न्यायदेवता आणि कर्मफळ दाता म्हटलं आहे. शनी जून महिन्यात वक्री करणार आहेत. याचाच अर्थ शनी (Lord Shani) उलटी चाल करणार आहेत. या दरम्यान शनी तब्बल 30 वर्षांनंतर आपली मूळ रास कुंभ राशीत (Aquarius Horoscope) वक्री होणार आहेत. शनीच्या या वक्री चालीमुळे काही राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार आहे. त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायात देखील प्रगती पाहायला मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांना शनीची वक्री चाल चांगलीच लाभदायक ठरणार आहे. याचं कारण म्हणजे शनीने कुंभ राशीत संक्रमण करून शश राजयोग बनवला आहे. त्याचबरोबर शनी कुंभ राशीबरोबर लग्न भावात वक्री होणार आहेत. त्यामुळे या दरम्यान तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल दिसून येईल. बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करण्यास सक्षम असाल. यामध्ये तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. भावा-बहिणींबरोबर तुमचं नातं घट्ट होईल. आर्थिकदृष्ट्या देखील तुमची परिस्थिती चांगली असणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


शनी देवाची उलटी चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभदायक असणार आहे. याचं कारण म्हणजे तुमच्या कुंडलीतील चतुर्थ भावात वक्री होणार आहेत. त्यामुळे या दरम्यान तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तसेच या काळात तुम्ही नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन देखील खरेदी करू शकता. तुमच्या व्यापारात देखील चांगली प्रगती पाहायला मिळेल. तुमच्याकडून पैशांच चांगली बचत होईल. त्याचबरोबर जे लोक रिअल इस्टेट, प्रॉपर्टी आणि जमीन जुमल्याच्या संदर्भात तुम्ही व्यवहार करू शकता. या काळात नोकरदार वर्गातील जे लोक आहेत त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. 


सिंह रास (Leo Horoscope)


शनी देवाची वक्री चाल सिंह राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. कारण शनी देव तुमच्या राशीतील सप्तमी भावात उलटी चाल करणार आहेत. या काळात विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनात सुख प्राप्ती होणार आहे. तुमच्याबरोबर तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होताना दिसणार आहे. आर्थिक बाबतीतही तुमची परिस्थिती चांगली असणार आहे. पैशांची बचत तुमच्याकडून चांगली होईल. तुम्हाला समाजात मान-सन्मान देखील मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Horoscope Today 03 May 2024 : आजचा दिवस खास! 'या' 3 राशींना धनयोग, तर 'या' राशींना बसणार आर्थिक फटका, वाचा 12 राशींचे आजचे राशीभविष्य