Horoscope Today 03 May 2024 : पंचांगानुसार, आज 03 मे 2024, आजचा दिवस शुक्रवार. आजचा दिवस काही राशींसाठी लाभदायक तर काही राशींसाठी तोट्याचा असणार आहे. आजच्या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आपल्या चीज वस्तू सांभाळा कामाची सुरुवात जोमाने कराल. पण, आरंभशुर बनू नका. महिलांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुद्ध विचार करावा. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


आज तुम्ही हाती घेतलेले काम नेटाने पुढे चालवाल. अनेक लाभ मिळतील. आत्मविश्वास वाढेल. धाडसाने एखादे काम करण्यासाठी पुढे सरसावाल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


प्रत्येक क्षणी आपापली भूमिका नेमकी ओळखून त्या संबंधित कर्माचे कसोशीने पालन कराल. महिलांना घरातील वातावरण अस्वस्थ करेल. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


परदेशाबाबतची कामे अडली असतील तर त्या संदर्भात प्रयत्न करावे लागतील. वाद घालू नका.


सिंह रास (Leo Horoscope Today)


समजुतीचे धोरण स्वीकारा. प्रतिकारातून प्रगती साधण्याचे कौशल्य तुम्हाला करावे लागेल.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आर्थिक अपेक्षा मनासारख्या पूर्ण होणार नाहीत. कोर्ट कचेऱ्यांमधील कामे थोडी मार्गी लागतील.


तुळ रास (Libra Horoscope Today)


सतत उद्योगी राहाल तर पदरात बरच काही पडेल. उशीर झाला तरी चालेल परंतु काम करायचं नाही असे करू नका. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


घरामध्ये जरा जास्त जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील. पूर्वी केलेल्या कामाची पावती मिळेल. महिलांना सौख्य मिळेल.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


सरकारी कामकाज किंवा नोकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. मुलांच्या बाबतीत सुखा वह बातम्या कानावर येतील.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


एखाद्या गोष्टीचा शांतपणे विचार कराल. उत्कृष्ट नियोजन करून स्वतःबरोबर दुसऱ्यालाही कामाला लावाल.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


चांगल्या विचारांच्या लोकांचा सहवास घडेल. नोकरी व्यवसायात आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहाल.


मीन रास  (Pisces Horoscope Today)


आज तब्येतीच्या दृष्टीने सावधानता बाळगायला हवी. काही बळवलेल्या आजारांमध्ये एकापेक्षा अनेक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Jayanti 2024 : यंदाची शनि जयंती कधी? या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका; शनि देईल कर्माचं फळ, एकामागोमाग येतील संकटं