![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : ना साडेसाती, ना वक्री चाल! 'या' राशीचे लोक अल्पावधीतच होतात मालामाल; शनीची सदैव असते कृपा
Shani Dev : सध्याच्या परिस्थितीत शनी कुंभ राशीत विराजमान आहे. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे.
![Shani Dev : ना साडेसाती, ना वक्री चाल! 'या' राशीचे लोक अल्पावधीतच होतात मालामाल; शनीची सदैव असते कृपा Shani Dev saturn lucky zodiac signs know in detail marathi news Shani Dev : ना साडेसाती, ना वक्री चाल! 'या' राशीचे लोक अल्पावधीतच होतात मालामाल; शनीची सदैव असते कृपा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/01d3318989396d49f4d2101f44d476da1720754624959358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Dev : आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, राशीचक्रात एकूण 12 राशी असतात. यामध्ये सर्वात आधी येते ती मेष रास आणि सर्वात शेवटी असणारी रास म्हणजे मीन रास. मेष आणि वृश्चिक राशींचा स्वामी ग्रह मंगळ आहे. तसेच, या राशींचं आराध्य भगवान हनुमान आहे. तर, मिथुन आणि कन्या राशींचा स्वामी ग्रह बुध आहे आणि आराध्य गणपती आहे. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी तर आराध्य भगवान शंकर आहे. तर, वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि आराध्य देवी दुर्गा आहे.
या व्यतिरिक्त कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे तर आराध्य भगवान शिव आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आणि तर आराध्य भगवान विष्णू आहे. मात्र, या सर्व राशींमध्ये एक रास अशी आहे जिच्यावर न्यायाचा देवता मानल्या जाणाऱ्या शनीची विशेष कृपा असते. शनीच्या कृपेने या राशीच्या लोकांची बिघडलेली कामे पूर्ण होतात. त्याचबरोबर अत्यंत कमी काळात या राशी धनवान होतात. ही रास नेमकी कोणती ते जाणून घेऊयात.
शनी संक्रमण
सध्याच्या परिस्थितीत शनी कुंभ राशीत विराजमान आहे. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. शनीच्या कुंभ राशीत संक्रमण केल्याने मकर राशीच्या लोकांवर साडेसातीचा अंतिम टप्पा सुरु आहे. तर, कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. तर, मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे.
या व्यतिरिक्त कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या चाल सुरु आहे. साडेसातीच्या काळात मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीवर शनीचा सर्वात जास्त प्रभाव आहे. शनीच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगलं यश मिळणार आहे. या राशीच्या लोकांना सर्व भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तसेच, तूळ राशीचा शुभ रंग पांढरा आहे. आणि या राशीचा शुभ अंक 2 आणि 7 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology : आज रवि योगासह जुळून आलेत अनेक शुभ योग; धनुसह 'या' 5 राशींवर बरसणार महालक्ष्मीची कृपा, मागाल ती इच्छा होईल पूर्ण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)