Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीला (Shani Dev) सर्वात शक्तिशाली ग्रह मानतात. क्रूर देवता शनी (Lord Shani) या नवीन वर्षात 2025 मध्ये कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचा 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, त्याआधी जवळपास 37 दिवसांसाठी शनी ग्रह अस्त अवस्थेत असणार आहे. त्यामुळे 3 राशींना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शनी ग्रह कोणत्या कालावधीत अस्त अवस्थेत असणार आहे आणि या काळात कोणत्या राशींना (Zodiac Signs) सावध राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात. 


या कालावधीत शनी होणार अस्त 


ज्योतिष शास्त्रानुसार, सर्वात हळुवार गतीने चालणारा शनी ग्रह एकाच राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत स्थित असतो. शनी ग्रह 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 07 वाजून 01 मिनीटांनी कुंभ राशीत शनी अस्त होणार आहे. या अवस्थेत शनी 6 एप्रिलपर्यंत असणार आहेत. अस्त अवस्थेत शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


शनी अस्त अवस्थेत असल्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ कठीण असणार आहे. या काळात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तसेच, याचा परिणाम तुमच्या खर्चावर देखील होऊ शकतो. तुम्हाला पैशांची चणचण जाणवू शकते. त्यामुळे पैशांचा विचारपूर्वक वापर करा. तसेच, या काळात कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु नका. तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांना या काळात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला सतत जाणवू शकते. तुम्हाला मानसिक समाधान लाभणार नाही. तसेच विनाकारण तुमचे वाद होतील. आरोग्यातही बदल जाणवतील. तसेच, कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. यासाठी कोणतंही काम करताना आधी सावधानता बाळगा. तसेच, तुमचं मन फार चंचल असेल. तुम्हाला एका कामात मन रमणार नाही. नवीन कामाकडून तुमच्या खूप काही अपेक्षा असल्यामुळे तुम्हाला तणाव जाणवेल. या काळात तुम्ही आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. वादविवादांपासून दूर राहा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Astrology : आज वृद्धी योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 3 राशींचं भाग्य लखलखणार, अचानक धनलाभाचे संकेत