Astrology Panchang 24 January 2025 : आज शुक्रवार, 24 जानेवारीला अनेक मोठ्या ज्योतिषीय घटना घडत आहेत. आज शुक्रवारी शनी शुक्राशी युती (Shani Shukra Yuti 2025) करेल आणि बुध मकर राशीत येऊन बुधादित्य योग (Budhaditya Yog) तयार करेल. तर चंद्र आज वृश्चिक राशीत असेल आणि आज गजकेसरी योग (Gajkesari Yog), वृद्धी योग (Vruddhi Yog) देखील निर्माण होईल. या योगांमुळे आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांना आज प्रयत्नांचं जास्त चांगलं फळ मिळेल. अज्ञात स्त्रोताकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार तुमच्या मनात तीव्र होऊ शकतो. तुम्हाला काही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या कामासाठीही दिवस चांगला असेल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. मुलांच्या वागण्यात तुम्हाला अचानक सकारात्मक बदल जाणवतील. तुमचे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आज तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि तुमची काही अडचण असेल तर ती सोडवतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ मिळाल्याने आनंद होईल.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संपत्ती वाढवणारा असेल. तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीत लाभ देईल. आज तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठी संधी मिळू शकते. आज तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाकडूनही कुटुंबात सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. तुम्ही तुमची आर्थिक योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवू शकाल. कायदेशीर बाबींमध्ये अडकत असाल तर कोणाच्या तरी सल्ल्याचा आणि मार्गदर्शनाचा फायदा होईल. काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचीही संधी मिळेल.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकतं. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळेल. परदेशी क्षेत्र आणि आयात-निर्यात कार्याशी संबंधित असलेल्यांसाठी दिवस लाभदायक आणि सकारात्मक राहील. तुम्हाला कुठूनतरी भेटवस्तूही मिळू शकते. भौतिक सुखसोयी वाढल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल. काही शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Horoscope Today 24 January 2025 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य


Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार