एक्स्प्लोर

Shani Dev : शनिदोष आणि साडेसातीचा प्रभाव कमी करायचाय? शनिवारी करा ही पूजा, शनिदेव होतील प्रसन्न!

Shani Dev : शनिवारचा दिवस शनि देवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी केलेल्या उपायांनी शनिदोष आणि साडेसातीचा प्रभाव कमी होतो.

Shani Dev : शनिवार हा शनि महाराजांचा दिवस मानला जातो. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी, तसेच त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी विविध उपाय केले जातात. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. तर तूळ ही शनीची उच्च राशी आहे. तर, मेष शनिची दुसरी नीच राशी आहे. ज्योतिषशास्त्रात शनि दंडाधिकारी मानला जातो, जो पीडित असतानाच नकारात्मक परिणाम देतो. जर एखाद्या व्यक्तीचा शनि उच्च असेल तर तो त्याला पदावरून राजा बनवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, पत्रिकेत शनि दोष असल्यास या दिवशी केलेल्या उपायांनी आराम मिळतो. या उपायांबद्दल जाणून घेऊया.

 

'या' गोष्टी साडेसातीचा प्रभाव कमी करतात
शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी-देवता वास करतात असे मानले जाते. शनिवारी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करून, त्यावर जल अर्पण करून आणि तेलाचा दिवा लावून शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात. यामुळे साडेसातीचा प्रभावही कमी होतो असे मानले जाते. शनिवारी काळ्या तिळाचे दान अवश्य करावे. असे केल्याने शनिदेवाची कृपा नेहमी राहते आणि राहू-केतूचे दोषही शांत होतात.

 


'या' मंत्रांनी शनि भगवान प्रसन्न होतात
शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, तसेच जन्मपत्रिकेतील साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी शनिदेवाच्या मंत्रांचा जप आणि शिव चालिसाचा पाठ केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात. शनि मंदिरात जाऊन शनि चालीसा, आरती केल्यास त्यांचे आशीर्वादही प्राप्त होतात.

 

शनिवारी 'या' वस्तूंचे दान करा
शनिवारी काळे ब्लँकेट, काळे कपडे दान करणे उत्तम मानले जाते. शनिवारी गरजूंना काळे कपडे किंवा काळे ब्लँकेट दान केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात. शनिदेवाला काळ्या वस्तू खूप प्रिय आहेत. या दिवशी लोखंडाचे दान करूनही शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे. या दिवशी गरजूंना धान्य दान केल्याने शनिदोष, साडेसाती, शनीची ढैय्या यांचा प्रभाव कमी होतो आणि शनिदेवही प्रसन्न होतात.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Shani Dev : मकर, कुंभ, मीन राशीवर साडेसाती, तर कर्क-वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव किती वर्षे राहील? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण महिना अद्भूत, 3 राशींच्या प्रगतीचा वेग दुप्पट! ग्रहांचे पॉवरफुल योग, पैसा, नोकरी, प्रेमात प्रचंड लाभ, भोलेनाथांची कृपा...
श्रावण महिना अद्भूत, 3 राशींच्या प्रगतीचा वेग दुप्पट! ग्रहांचे पॉवरफुल योग, पैसा, नोकरी, प्रेमात प्रचंड लाभ, भोलेनाथांची कृपा...
Shani Sade Sati: आता फक्त 1 चं वर्षाचा संघर्ष! 'या' राशीवर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू, 2027 पर्यंत काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात....
आता फक्त 1 चं वर्षाचा संघर्ष! 'या' राशीवर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू, 2027 पर्यंत काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात....
Horoscope Today 8 July 2026: आजचा बुधवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs 8 July 2026: 8 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! अनेक शुभ योग जुळतायत, अचानक धनलाभाचे प्रबळ संकेत, वाचा लकी राशी
8 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! अनेक शुभ योग जुळतायत, अचानक धनलाभाचे प्रबळ संकेत, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Embed widget