Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनी (Shani Dev) हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. इतर ग्रहांच्या तुलनेत शनी हा संथ गतीने चालणारा ग्रह आहे. शनी आणि गुरु हे दोन ग्रह फार महत्त्वाचे आहेत. हे ग्रह सर्वात शक्तिशाली मानले जातात. शनी (Lord Shani) कुंडलीमध्ये दहाव्या आणि अकराव्या घरात म्हणजेच कर्म आणि उत्पन्नाचा स्वामी आहे. याशिवाय शनी हा सहाव्या, आठव्या आणि अकराव्या घराचा कारक ग्रह आहे. याबरोबरच मकर आणि कुंभ राशीचा शासक ग्रह शनी असून तिसऱ्या, सातव्या आणि दहाव्या घरात त्याची दृष्टी आहे. 


शनी प्रत्येक व्यक्तीवर रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पाडतो. याच कारणामुळे शनीला सर्वात मोठा ग्रह म्हटले गेले आहे. शनी हा प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. यासाठीच शनीचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेणं गरजेचं आहे. यासाठीच कोणत्या राशीच्या लोकांना शनीचा सर्वात जास्त त्रास होतो? आणि शनीला शांत कसे करावे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  


कोणत्याही कुंडलीचे दुसरे घर लाभाचे घर असते आणि नववे घर भाग्याचे असते. तर दहावे घर हे कर्माचे असते. अशा स्थितीत शनी हा दुसऱ्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. आणि गुरु हा भाग्याच्या नवव्या घराचा स्वामी आहे. असं म्हणतात की, जेव्हा तुमचं नशीब चांगलं असते तेव्हा तुमचे कर्म चांगले असते. याचा तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे नशिबाचे घर देखील शनीच्या नियंत्रणात आहे. 


'हे' लोक शनीच्या प्रभावाखाली असतात 



  • जर तुमच्या कुंडलीत सहाव्या, आठव्या बाराव्या घरात शनी असेल. याबरोबरच, सर्वाष्टक वर्गात चार गुणांपेक्षा कमी गुण असतील तर शनी वाईट प्रभाव देईल. 

  • जर शनी ग्रह आपल्या सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरातील शासक ग्रहांबरोबर बसला तरी त्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होईल. 

  • जर शनी राहू, केतू आणि सूर्य, चंद्राबरोबर बसला असेल तर त्याचे वाईट परिणाम मिळतातय.

  • शनी मंगळ ग्रहाच्या सहवासात असल्यास जीवनात अस्थिरता येते. 


शनि दोषाची लक्षणं 



  • ज्योतिषशास्त्रात शनीला दु:खाचे कारण मानले आहे. दु:खाचे कारण म्हणजे आर्थिक नुकसान आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत शनीच्या वाईट प्रभावामुळे आर्थिक तंगी होते. 

  • वडिलोत्पार्जित मालमत्तेत काही प्रकारचा त्रास जाणवेल. 

  • कुंडलीत शनी अशुभ असल्यामुळे पोट, गुडघ्याचे आजार, एॅसिडीटी यांसारख्या शारीरिक समस्या उद्भवतात. मानसिक तणाव जाणवतो, नैराश्य वाढते. 

  • घरामध्ये जास्त ओलसरपणा किंवा भेगा पडणे हे देखील शनिदोषाचे कारण मानले आहे. 


शनीला शांत कसं कराल? 



  • वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमच्या कुंडलीत शनी योग्य स्थितीत नसेल तर तुम्ही काही उपाय करू शकतात. यामुळे शनी तुमच्यावर प्रसन्न राहील. आणि तुमच्या शनीच्या दुष्टांपासूनही आराम मिळेल. 

  • घरातील कोणी आजारी असेल तर पलंगाच्या खाली घोड्याचा नाल ठेवावा. 

  • घरातील कोणताही सदस्य पुन्हा-पुन्हा आजारी राहिल्यास कढईत किंवा भांड्यात मोहरीचे तेल टाकून त्यात घोड्याच्या नालची अंगठी घालावी. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


May Grah Gochar 2024 : मे महिन्यात ग्रहांचं मोठं संक्रमण; प्रत्येक राशीत घडतील मोठे बदल, कोणत्या ग्रहाची चाल कधी बदलणार? जाणून घ्या