Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रहांच्या राशींमध्ये शनी (Shani Dev) आणि गुरूचं राशींमध्ये होणारं संक्रमण फार महत्त्वाचं मानलं जातं. गुरु ग्रहाला ज्योतिषशास्त्रात भाग्य, लग्न आणि सुखाचा कारक मानला जातो तर शनि ग्रहाला (Lord Shani) न्यायदेवता आणि क्रूरतेचा देवता मानण्यात आलं आहे. सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. शनीने एक राशीत प्रवेश केल्यानं तब्बल अडीच वर्षांच्या कालावधीनंतर तो आपलं राशीपरिवर्तन करतो. अशा प्रकारे सर्व राशींचं राशीचक्र पूर्ण करण्यासाठी शनीला तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनी सध्या आपली मूळ रास कुंभ राशीत आहे. शनीचं कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण 2025 मध्ये होणार आहे.
शनी कुंभ राशीत असल्या कारणाने शश राजयोग निर्माण झाला. ज्योतिष शास्त्रात शश राजयोगाला फार चांगला राजयोग मानला आहे. हा राजयोग पंचमहापुरुषांमध्ये एकच मानला गेला आहे. शनीच्या कुंभ राशीत स्थित असल्या कारणाने शश राजयोग तयार झाला. यामुळे अनेक राशींना पुढचे काही दिवस लाभ होणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शश राजयोग तयार झाल्याने वृषभ राशीला 2025 पर्यंत कोणत्याच संकटांचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या कुंडलीत हा शश राजयोग दहाव्या स्थानी स्थित आहे. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये कोणत्याच प्रकारचा अडथळा येणार नाही. तसेच चांगले लाभही मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसाय, नोकरीत तुमची प्रगती होईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
हा राजयोग तयार झाल्याने मकर राशीला देखील याचा लाभ मिळणार आहे. तुमच्या कुंडलीत राजयोग 11 व्या स्थानी स्थित आहे. त्यामुळे 2025 पर्यंत तुम्ही देखील या राजयोगामुळे लाभदायी ठरणार आहात. धन-संपत्तीत वाढ होईल. पैशांचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. उच्च शिक्षणासाठी तुम्हाला परदेशीही जाण्याची संधी मिळू शकते. नोकरदार वर्गावर या दरम्यान शनीची कृपा या राशीवर सदैव असेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीच्या कुंभ राशीत असल्या कारणाने शश राजयोग तयार झाला आहे. हा राजयोग तुमच्या लग्न भावात निर्माण झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत शनी मीन राशीत परिवर्तन करत नाही तोपर्यंत तुम्हाला लाभ मिळणार आहे. तसेच, या दरम्यान कुटुंब, नोकरी, करिअर संदर्भात आनंदाची बातमीही मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: