May Grah Gochar 2024 : मे महिना (May) अवघ्या काही दिवसांनी सुरु होणार आहे. सण, समारंभ, उपवासाच्या दृष्टीने हा महिना लवकरच सुरू होणार आहे. मे महिना हा उपवास आणि सणांच्या (Festivals) दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात अनेक ग्रह आपली राशी (Horoscope) बदलणार आहेत. मे महिन्यात कोणत्या दिवशी कोणता ग्रह मार्गक्रमण करणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


1 मे रोजी गुरु ग्रहांचं संक्रमण 


मे महिन्यात अनेक मोठे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करणार आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे ग्रहाचे संक्रमण 1 मे रोजी होणार आहे. 1 मे ला गुरु ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तब्बल 18 वर्षांनंतर वृषभ राशीतील गुरुचे हे संक्रमण होणार आहे. यामुळे हे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.


गुरू ग्रह हा विस्तार, प्रगती आणि ज्ञानासाठी ओळखला जातो. गुरु बृहस्पति वृषभ राशीत स्थिरता आणतो. देवांचा गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहस्पतिच्या राशीतील बदल खूप प्रभावी आणि शक्तिशाली असणार आहेत. या संक्रमणामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत. 


10 मे रोजी बुध ग्रहाचं संक्रमण 


10 मे रोजी ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धिमत्तेचा कारक बुध ग्रहाचे संक्रमण होणार आहे. या दिवशी बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत असेल तर जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा मिळतात. बुध ग्रह तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि चांगले आरोग्य आशीर्वाद देतात. जेव्हा राशी बदलते तेव्हा बुध ग्रह व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम देतो. 10 मे रोजी होणारे हे संक्रमण अनेक राशींना अनपेक्षित परिणाम देईल.


14 मे रोजी सूर्याचं संक्रमण


सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. 14 मे 2024 रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल आणि 14 जूनपर्यंत या राशीत राहील. सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थिरता आणि करिअरमध्ये मजबूत पद मिळविण्यात सूर्य ग्रह महत्त्वाची भूमिका बजावतो.


सूर्य देव अधिकार आणि शासनाचे प्रतिनिधित्व करतो. पुरुषांच्या कुंडलीत ते वडिलांचे प्रतिनिधित्व करतात, तर स्त्रीच्या कुंडलीत सूर्य तिच्या पतीच्या जीवनाबद्दल सांगतो. वृषभ राशीतील सूर्याची स्थिती शक्ती आणते. 


19 मे रोजी शुक्राचे संक्रमण (Venus Transit May 2024)


19 मे रोजी शुक्र मेष राशीतून बाहेर पडून स्वतःच्या राशीत वृषभ राशीत जाईल. 12 वर्षांनंतर 19 मे रोजी वृषभ राशीत गुरु-शुक्र संयोग दिसणार आहे. वृषभ, शुक्र, गुरु आणि सूर्य एकत्र येऊन त्रिग्रही योग तयार होतील. ज्योतिष शास्त्रात शुक्र हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो कारण तो जीवनात सर्व प्रकारच्या सुखसोयी आणतो. शुक्र हा प्रेम, उपभोग, विलास, आनंद, समृद्धी आणि संसाधनांचा शासक ग्रह आहे. शुक्राचे हे संक्रमण आणि या संक्रमणामुळे तयार होणारे शुभ योग अतिशय सकारात्मक परिणाम देतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : 12 मे पासून बदलणार शनीची चाल; 'या' राशींचा शुभ काळ होणार सुरू, नोकरी-व्यवसायात प्रगतीसह उत्पन्न वाढणार