Mangal-Shani Yuti : वैदिक ज्योतिष शास्त्रात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये (Horoscope) बदल करतात. ग्रहांच्या संक्रमणामुळे राशींमध्ये ग्रहांची युती होते. मंगळ आणि शनि एकमेकांच्या अगदी जवळ येत असल्यामुळे अंगारक योग तयार होईल. हा योग कोणत्या राशींसाठी घातक ठरेल आणि कोणाला त्यांच्या करिअरमध्ये चमकण्याची संधी मिळेल? हे जाणून घेऊयात. 


मंगळ आपल्या उच्च राशीच्या मकर राशीतून बाहेर पडला आहे आणि 15 मार्च रोजी शनीच्या राशीत पोहोचला आहे. कुंभ राशीत बसून शनी त्यांचे यजमानपद करीत आहे. 22 एप्रिलपर्यंत शनि आणि मंगळ अवकाशात एकत्र राहतील. 


शनि हा वायु कारक आहे आणि मंगळ हा अग्नि कारक आहे. अग्नी आणि वायू एकत्र आल्यावर आग वाढते आणि आगीच्या घटना वाढतात. त्यामुळे येत्या 22 एप्रिलपर्यंतचा काळ कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.  


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी, त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. इंडिनिअरिंग संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. या दरम्या, भावंडांसोबर वाद घालू नका. जर वाद झाल्यास समजूतदारपणा दाखवा आणि वाद मिटवा. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांनी या काळात थोडं सावध राहावं. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तसेच, या काळात जास्त प्रवास करणंही तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे प्रवास शक्यतो टाळा. हा ग्रह काम करताना इजा होण्याची शक्यता निर्माण करत आहे. आरोग्याची काळजी घेत करिअरमध्ये पुढे जावे लागेल. प्रवास करताना, सीट बेल्ट किंवा हेल्मेट घाला.  


सिंह राशीचे सूर्य चिन्ह (Leo Horoscope)


या राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनाची खूप काळजी घ्यावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अतिशयोक्ती करू नका, अन्यथा त्या गोष्टी सुख-शांतीमध्ये वाद निर्माण करू शकतात. महिला नोकरीसाठी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. 


मकर रास (Capricorn Horoscope)


या राशीच्या लोकांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. कुटुंबात काही वाद सुरू असतील तर ते शांततेने सोडवा अन्यथा कुटुंबातील सुख-शांती भंग होऊ शकते. जे प्रगतीसाठी खूप प्रयत्न करत होते त्यांनाही आता चांगली संधी मिळू शकते. नोकरीतही बदलीची शक्यता वाढेल.


कुंभ रास (Aquarius Horoscope)


यावेळी, कुंभ राशीचे लोक खूप संतुलित असतील; उत्साह आणि निराशा वारंवार येईल आणि जाईल. कधी अचानक आनंद मिळेल तर कधी निराशा येईल. स्वत:ला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या करिअरमध्ये जे काम करत आहात ते करत राहा. मंगळ आणि शनीचा हा प्रकाश तुमचे काम सर्जनशीलतेकडे घेऊन जाईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : 2038 पर्यंत 'या' राशींवर असणार शनिची साडेसाती; एकामागोमाग करावा लागणार संकटांचा सामना