Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रात, सर्व प्रकारची ज्योतिषीय गणना 9 ग्रह, 27 नक्षत्र आणि 12 राशींच्या आधारे केली जाते. वैदिक ज्योतिषात ग्रहांची विशेष भूमिका आहे. सर्व ग्रहांपैकी शनि (Shani Dev) हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. शनिचा प्रभाव व्यक्तीला त्याच्या कर्मावर आधारित असतो. ज्योतिषशास्त्रात शनीच्या राशीतील बदलाला खूप महत्त्व आहे.


सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यास शनिला तब्बल अडीच वर्ष लागतात. याशिवाय शनीची साडेसाती खूप क्लेशकारक मानली जातात. ज्या राशींवर शनीची साडेसाती बसते त्यांना जीवनात विविध प्रकारच्या समस्या आणि दु:खांना सामोरं जावं लागतं. व्यक्तीला प्रत्येक कामात आव्हानांचा सामना करावा लागतो.


ज्योतिष शास्त्रात शनिचं महत्व :


ज्योतिष शास्त्रात शनिचं विशेष महत्त्व आहे. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. शनिच्या संथ गतीमुळे लोकांवर त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा सेवक, कष्ट, तंत्रज्ञान आणि तेल इत्यादी कारक ग्रह मानला जातो. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. शनि तूळ राशीमध्ये उच्च आणि मेष राशीमध्ये दुर्बल आहे.  


सन 2038 पर्यंत कोणत्या राशीत शनिची साडेसाती राहील?



  • सध्या शनि कुंभ राशीत आहे. अडीच वर्ष कुंभ राशीत राहिल्यानंतर 2025 मध्ये शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मेष राशीवर शनिची साडेसातीची पहिली अवस्था सुरू होईल. साडेसातीचा दुसरा टप्पा मीन राशीवर असेल आणि शेवटचा टप्पा कुंभ राशीवर असेल. कुंभ राशीचे लोक 3 जून 2027 पर्यंत साडेसातीच्या प्रभावाखाली असतील. 

  • 2025 मध्ये जेव्हा शनीची राशी बदलते तेव्हा मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू होईल. ही साडेसाती 2032 पर्यंत राहील.

  • 2027 मध्ये वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. 

  • मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिची साडेसाती 8 ऑगस्ट 2029 पासून सुरू होईल आणि 2036 पर्यंत संपेल.

  • कर्क राशीच्या लोकांसाठी मे 2032 पासून शनिची साडेसाती सुरू होईल. या राशीवर साडेसाती 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत राहील.

  • वर्ष 2025 ते 2038 पर्यंत कुंभ, मीन, मेष, वृषभ आणि कर्क राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 11 April 2024 : कर्क, सिंह, कन्या, मीन राशीला मिळतील शुभ संकेत; इतर राशींसाठी दिवस फायद्याचा की तोट्याचा? वाचा गुरुवारचं राशीभविष्य