Shani Dev: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला कर्माची देवता म्हटली जाते. सूर्यदेव हे शनिदेवांचे पिता आहेत. शनिदेवांची आई छाया होती म्हणून त्यांना छायापुत्र म्हणूनही ओळखले जाते. शनिदेव शनि ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि ते शनिवारचे स्वामी आहेत. त्याचा मोठा भाऊ यम यांनाही मृत्यूची देवता म्हणतात. मृत्यूनंतर यम एखाद्याच्या कर्माचे फळ देतो, तर शनीदेव यांनी व्यक्तीच्या वर्तमान जीवनात कर्मांचे फळ देण्यासाठी ओळखले जाते. हिंदू ज्योतिषावर शनीचा प्रभाव दिसून येतो. भगवान शनी यांचा जन्म वैशाख वद्य चतुर्दशी अमावस्येला झाला होता; जी शनि अमावस्या किंवा शनि जयंती म्हणून साजरी केली जाते. आज आम्ही शनिवार निमित्त काही खास मंत्रांबद्दल सांगणार आहोत. दर शनिवारी श्री शनिदेवाच्या या विशेष मंत्रांचा जप केल्याने कीर्ती, सुख, समृद्धी, कीर्ती, शौर्य, वैभव, यश आणि अपार संपत्ती सोबतच प्रगतीचे दरवाजे उघडतात. येथे दिलेल्या कोणत्याही मंत्राचा किमान 1 जपमाळ (108) वेळा जप करा. एक मंत्र निवडा आणि त्याचा जप करा.

 

1. बीज मंत्र

 

ॐ शं शनैश्चराय नम:

 

2. शनि का वेदोक्त मंत्र

 

ॐ शमाग्निभि: करच्छन्न: स्तपंत सूर्य शंवातोवा त्वरपा अपास्निधा:

 

3. श्री शनि व्यासविरचित मंत्र- 

 

ॐ नीलांजन समाभासम्। रविपुत्रम यमाग्रजम्।

छाया मार्तण्डसंभूतम। तम् नमामि शनैश्चरम्।।

 

4. शनिचर पुराणोक्त मंत्र-

 

सूर्यपुत्रो दीर्घेदेही विशालाक्ष: शिवप्रिय: दमंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:

 

5. शनि स्तोत्र-

 

नमस्ते कोणसंस्थाचं पिंगलाय नमो एक स्तुते

नमस्ते बभ्रूरूपाय कृष्णाय च नमो ए स्तुत

नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च

नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो

 

नमस्ते मंदसज्ञाय शनैश्चर नमो ए स्तुते

प्रसाद कुरू देवेश दिनस्य प्रणतस्य च

कोषस्थह्म पिंगलो बभ्रूकृष्णौ रौदोए न्तको यम:

 

सौरी शनैश्चरो मंद: पिप्लदेन संस्तुत:

एतानि दश नामामी प्रातरुत्थाय ए पठेत्

शनैश्चरकृता पीडा न कदचित् भविष्यति

 

6. तंत्रोक्त मंत्र

 

ॐ प्रां. प्रीं. प्रौ. स: शनैश्चराय नम:

 


हेही वाचा>>>


Maha Kumbh 2025: कुंभमेळ्यात भेटली स्वर्गातली 'अप्सरा'? सोनेरी डोळ्यांची 'ती' मुलगी कोण? नैसर्गिक सौंदर्याने इंटरनेटवर खळबळ! फोटो व्हायरल


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )