Saif Ali Khan Knife Attack : अभिनेता सैफ अली खानवरती (Saif Ali Khan) हल्ला प्रकरणात पोलिस तपासात अनेक नवीन खुलासे होताना दिसत आहेत. अभिनेता सैफ अली खानची (Saif Ali Khan) तब्येत सुधारत असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी करीना कपूर-खान हिचा जबाब नोंदवला आहे. करीनाच्या जबाबातून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे माहिती मिळाले आहे. घरात घुसलेला हल्लेखोर अतिशय आक्रमक होता, त्याने यावेळी एक कोटी रुपयांची मागणी केल्याचीही धक्कादायक माहिती यावेळी करीनाने पोलिसांना दिली आहे.(Saif Ali Khan Knife Attack)


करीनाच्या जबाबातील महत्वाचे मुद्दे


करीनाने पोलिसांना जबाब दिला असून त्यामध्ये तिने काही महत्त्वाची माहिती दिली आहे. ती म्हणाली, चोर घरात शिरल्याचे पाहिल्यानंतर नर्सने आरडा-ओरडा केला. त्यानंतर सैफ आणि करिनाने त्याच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. याच खोलीमध्ये मुलगा असल्याने करीना चिंतेत होती. चोर घरात असताना काही मौल्यवान वस्तू दागिने असताना ते त्याने चोरले नाहीत. आरोपी घरात चाकूचा धाक दाखवून नर्स लिमाकडे त्याने एक कोटी रूपयांची मागणी केली. अज्ञात व्यक्ती घरात चाकू घेऊन असल्याचे पाहिल्यानंतर करीना घाबरली होती, असंही तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.


'हल्लेखोराने दागिन्यांना हातही लावला नाही'


या हल्ल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री करीनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे की, जेव्हा आरोपी घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक दिसत होता पण, त्याने घरातून काहीही चोरी केली नाही. करीनाच्या या जबाबानंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.


हल्लेखोर खूप आक्रमक होता -  करीना कपूर


करीनाने पोलिसांना सांगितले की, जेव्हा सैफ आणि तो व्यक्ती समोरासमोर आले, त्यांच्यात झटापट झाली त्यावेळी आरोपी खूप आक्रमक होता, पण सर्वजण त्याच्यापासून लांब जाण्यात आणि घराच्या 12 व्या मजल्यावर जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे करीना खूपच चिंतेत होती. ती चिंतेत असल्यामुळे तिची बहीण करिश्मा कपूर तिला तिच्या घरी घेऊन गेली. पोलिसांना दिलेल्या जबाबात करीनाने म्हटलं आहे की, दागिने घरात समोर ठेवले होते, पण हल्लेखोराने त्यांना हातही लावला नाही.


सैफ अली खानवर केलेल्या हल्यानंतर घरात नर्स आणि करीना यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोर उभा राहतो. या घटनेने मानसिक तणावात असलेल्या करीनाला घटनेनंतर बहिण करिष्माने तिच्या घरी नेलं असल्याची माहिती समोर आली आहे.