Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. तसं, पाहायला गेल्यास शनीला (Lord Shani) सर्वात अशुभ परिणाम देणारा ग्रह मानला जातो. पण, ऑगस्ट महिन्यात शनी काही राशीच्या लोकांना अतिशय शुभ परिणाम देणार आहे. या राशींमध्ये शनी काही राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार शुभ फळ देणार आहे. ज्यामुळे तुमच्या करिअर, बिझनेस आणि लव्ह लाईफमध्ये चांगले परिणाम घडलेले दिसून येतील. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


यावर्षी काही राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा सण हा काही राशींच्या लोकांसाठी चांगला लाभ घेऊन येणारआहे. या राशीच्या लोकांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी साजरी केल्यानंतर 15 नोव्हेंबर 2024 ला शनी मार्गी लागणार आहेत त्यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांना या काळात चांगला लाभहोणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे या दरम्यान पूर्ण होतील. तुमच्या करिअरमध्ये देखील तमची चांगली प्रगती होईल. कामानिमित्त तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा सण हा एखाद्या लॉटरीप्रमाणे  वाटू शकतो. या दरम्यान तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाल चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सहज सोपी होतील. तसेच, ज्या लोकांनी नुकताच स्टार्टअप सुरु केला आहे अशा लोकांना देखील शनी शुभ फळ देणार आहे. पण, तुम्हाला वेळेचं भान ठेवून काम करावं लागेल. तसेच, शनीला खोटं बोलणारे लोक आवडत नाहीत. त्यामुळे आपल्या म्हणण्यावर ठाम राहा. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांचा दिर्घकाळापर्यंत हा काळ दिवाळी सारखाच असेल. तसेच, जर तुमच्या आयुष्यात काही उतार-चढाव असतील तर ते या काळात दूर होतील. अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी तु्म्ही तयार व्हाल. तुम्ही जी मेहनत घ्याल त्याला तुम्हाला चांगलं यश मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Kalki Jayanti 2024 : 9 की 10 ऑगस्ट कल्की जयंती नेमकी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी