Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीला (Lord Shani) महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. शनीला (Shani Dev) पापी ग्रह असं देखील म्हटलं जातं. आपल्या अशुभ प्रभावांनी प्रत्येकाला शनी भयभीत करतात. शनीच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. शनीच्या याच साडेसातीचा प्रभाव बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांना देखील करावा लागला होता. या दरम्यान त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? तसेच, त्यांनी या साडेसातीवर कशी मात केली? या संदर्भात त्यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये माहिती दिली.
यूट्यूबर रणवीर अहलुबादीया याच्या टीआरएस (TRS) सीरिज एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी यांनी नुकतीच आपल्या आगामी 'भैय्या जी' या चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. पण, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राबद्दल देखील त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
माझा ज्योतिषशास्त्रावर ठाम विश्वास - मनोज वाजपेयी
"माझा ज्योतिषशास्त्रावर ठाम विश्वास असून मी ज्योतिषशास्त्राचा विद्यार्थी आहे. गुरु आनंद आचार्य हे माझे गुरु आहेत." असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. त्याचप्रमाणे तुम्हाला कधी शनी साडेसातीचा सामना करावा लागला आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी 'हो' असं उत्तर दिलं. याबाबतीत सांगताना ते म्हणाले की, "शनीचा काळ हा साडेसात वर्षांचा असतो.
माझ्यामागे पाच वर्ष शनीची साडेसाती - वाजपेयी
माझ्यावर शनीची साडेसातीचा पहिले पाच वर्ष प्रचंड प्रभाव होता. मी खूप वेळा शनीच्या साडेसातीचा अनुभव घेतला आहे. जेव्हा साडेसाती आली तेव्हा मी सत्या सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा केला. शूल, कौन आणि अक्स सारखे सुपरहिट चित्रपट दिले. पण, तरीही माझ्याकडे काम नव्हतं.
यशाच्या शिखरावर असतानाही हाती काम नव्हतं
जेव्हा मी यशाच्या उच्च शिखरावर असताना मी घरी बसलो आहे. या दरम्यान मी सतत आजारीसुद्धा पडायचो. पण, माझा हा साडेसातीचा काळ आहे हे मला माहीत होतं. त्यामुळे मला फार त्रास होणार आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच, माझ्या हातात काही काम येणार नाही हेही मला माहीत होतं. आणि या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर घडत होत्या. त्यामुळे मी मानसिकृदष्ट्या तयार होतो."
ज्योतिषशास्त्र नेहमी तुम्हाला मार्गदर्शन देतो...
या दरम्यान त्यांनी एक गोष्ट सांगितली की, "ज्योतिषशास्त्र जाणून घेण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, तो तुम्हाला एक गाईडसारखा ट्रिट करतो. तो तुम्हाला नेहमी सावध करतो. त्यामुळे तुम्हाला त्या काळात नेमकं काय करायचं आहे याची आत्तापासूनच तयारी करा. जेणेकरुन तुमचा त्रास कमी होईल." यासाठीच तुम्हाला जेव्हा काम मिळतं तेव्हा तुम्ही त्या कामाप्रती ग्रेटफुल असणं गरजेचं आहे. तसेच, अशा वेळी तुम्ही ती वेळ आठवली पाहिजे ज्या वेळी तुमच्या हातात काम नव्हतं. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केल्याने तुम्ही सावध असता तसेच, समोर येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार होता असं वाजपेयी म्हणाले.
मनोज वाजपेयी यांचे आगामी प्रोजेक्ट्स
मनोज वाजपेयी यांचा नुकताच भैय्या जी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तसेच, या आधी त्यांनी 'द फॅमिली मॅन' सारख्या सुपरहिट वेबसीरिजमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. फॅमिली मॅन सीझन 3 चा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे अशी माहिती आहे.
हेही वाचा: