एक्स्प्लोर

Shani Dev: आज जुलै सुरू, उद्या 'शनि' बॅक इन अ‍ॅक्शन मोड! 2 जुलैपासून कोणत्या राशी मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, 2 जुलै रोजी शनिच्या स्थानात मोठा बदल होणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशी भाग्यशाली? कोणत्या राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे?

Shani Dev: शनिदेव... ज्यांचा उल्लेख होताच अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. कारण हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर शनिदेव हे न्यायाचे देव आहेत. ते कर्माचे फळ देणारे देव आहेत. जर व्यक्तीचे कर्म चांगले असतील, तर शनिदेवांची मोठी कृपा होते, पण तेच जर कर्म वाईट असेल, तर त्याला शनिच्या दोषांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रहाच्या स्थानातील लहानशा बदलाचाही लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. शनि, 2 जुलै 2026 रोजी आपले स्थान बदलत आहे. ज्याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर होताना दिसणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशी मालामाल? कोणाला टेन्शनचा सामना करावा लागणार आहे?

जुलै सुरू होताच शनिच्या हालचालीत मोठा बदल...! (Shani Dev)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्माचे फळ देणारा शनि, 2 जुलै 2026 रोजी आपले स्थान बदलत आहे. तो रेवती नक्षत्राच्या पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाईल. शनिच्या स्थानातील लहानशा बदलाचाही लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. प्रत्येक नक्षत्राची वेगवेगळी स्थाने किंवा टप्पे असतात, ज्यात ग्रहांचे भ्रमण होते. बुध हा रेवती नक्षत्राचा स्वामी आहे. शनिचे या नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात होणारे संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरेल, तर इतरांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यासोबतच शनि 27 जुलै रोजी वक्री होईल आणि या अवस्थेत असताना 20 ऑगस्ट 2026 रोजी रेवती नक्षत्राच्या पहिल्या स्थानात परत येईल. हा काळ प्रत्येक राशीसाठी कसा असेल ते जाणून घ्या.

वृषभ, मिथुनसह 5 राशींसाठी फायदाच फायदा...

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या रेवती नक्षत्रातील संक्रमणामुळे वृषभ, मिथुन, सिंह, तूळ आणि धनु राशींना फायदा होण्याची शक्यता आहे. या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. काहींना अपेक्षेपेक्षा जास्त पैसेही मिळू शकतात. त्यांचा दर्जा आणि प्रभाव वाढेल. त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या ते प्रभावीपणे पार पाडू शकतील. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात यश मिळण्याची शक्यता आहे.

4 राशींवर मिश्र परिणाम

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या, मकर, कुंभ आणि मीन राशींना शनिच्या नक्षत्र संक्रमणामुळे मिश्र परिणाम जाणवू शकतात. याचा अर्थ असा की, काहींना आर्थिक लाभ होऊ शकतो, तर काही जण अविचारी व्यवहार किंवा गुंतवणुकीत गुंतून नुकसान सोसू शकतात. इतरांसाठी, वरिष्ठांशी होणारे वाद त्यांना गंभीर अडचणीत आणू शकतात. म्हणून, या काळात विचारपूर्वक बोला आणि घाईचे निर्णय घेणे टाळा.

कोणत्या राशींना सावध राहण्याचा इशारा?

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या नक्षत्र बदलाच्या काळात मेष, वृश्चिक आणि कर्क या तीन राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या लोकांनी वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. नियम मोडणे टाळा. गुंतवणूक करणे टाळा. कौटुंबिक समस्या शांतपणे सोडवा, अन्यथा वाद वाढू शकतात.

शनिच्या प्रकोपापासून वाचण्याचे उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात शनिच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी, प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनिशी संबंधित वस्तू, जसे की मोहरीचे तेल, काळे तीळ, काळी उडीद डाळ, छत्री, बूट आणि काळे कपडे दान करा. भगवान हनुमानाची पूजा करणे देखील खूप फायदेशीर ठरेल.

हेही वाचा :

July 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! जुलै महिन्यात मोठा यू-टर्न, 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..मासिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navpancham Rajyog 2026 : सूर्य-शनिचा मिळून बनणार नवपंचम राजयोग; 'या' 4 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जबरदस्त धनलाभाचे संकेत
सूर्य-शनिचा मिळून बनणार नवपंचम राजयोग; 'या' 4 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जबरदस्त धनलाभाचे संकेत
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Shravan 2026 : श्रावणात श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहताना अशी घ्या काळजी; धन-संपत्तीसाठी 'असा' करा बेलाचा वापर
श्रावणात श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहताना अशी घ्या काळजी; धन-संपत्तीसाठी 'असा' करा बेलाचा वापर
Hindu Religion: श्रावण शुक्रवारी 'वैभवलक्ष्मी व्रत' का करतात? पुरूषही करू शकतात हे व्रत? शुक्रवारीच का करतात? व्रताचे नियम, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
श्रावण शुक्रवारी 'वैभवलक्ष्मी व्रत' का करतात? पुरूषही करू शकतात हे व्रत? शुक्रवारीच का करतात? व्रताचे नियम, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget