Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांना कर्माचे फळ देणारी देवता म्हटले जाते. आणि ज्याच्यावर ते दयाळू होतात. त्याचे नशीब रात्रभरात चमकू शकते. असंच काहीसं भाग्य 12 पैकी 3 राशींच्या नशीबी येणार आहे. 28 एप्रिल ही तारीख अत्यंत फलदायी ठरणार आहे. कारण या दिवशी शनिदेव आपले नक्षत्र बदलणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसणार आहे.
शनिदेवांच्या कृपेने कोणत्या 3 राशींचे भाग्य चमकणार?
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह सर्वात कमी वेगाने आपली राशी बदलतो. 27 नक्षत्रांच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी अंदाजे 27 वर्षे लागतात. यामुळेच शनीच्या राशी बदलाचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. वैदिक पंचांगानुसार सोमवार, 28 एप्रिल रोजी सकाळी 7:52 मिनिटांनी शनि उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. शनिदेवांच्या कृपेने जाणून घेऊया कोणत्या 3 राशींचे भाग्य चमकणार आहे?
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनीचे संक्रमण वृषभ राशीसाठी फलदायी ठरेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. सामाजिक लाभ होऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. कामाचा ताण वाढू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.
वृश्चिक
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील. नात्यात गोडवा वाढेल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात प्रगती होऊ शकते. शनीचे नक्षत्र बदल करणे फायदेशीर ठरेल. वादविवादांपासून दूर राहाल. संपत्ती वाढेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा होणारा नक्षत्र बदल हा अत्यंत शुभ राहील. उत्तराभाद्रपद नक्षत्रातील शनि संक्रमण जीवनात चांगले बदल घडवू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नाते अधिक घट्ट होईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारू शकतात. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. मन प्रसन्न राहील. तुमच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळेल. रोखलेले पैसे परत मिळू शकतात. वादांपासून अंतर राखले जाईल. आयुष्यात प्रेम वाढेल. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते.
हेही वाचा :