Shani Dev 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार,  शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. नवग्रहांमध्ये शनिदेवाचं स्थान अतिशय खास असल्याचं सांगितलं जातं. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जो व्यक्ती वाईट कर्म करतो त्याला शनि (Shani) कष्ट देतो, तर चांगले कर्म करणाऱ्यांना चांगलं फळ देतो. शनीच्या वक्रदृष्टीला सर्वच जण घाबरतात. शनि जेव्हा नाराज होतो, त्यावेळी व्यक्तीच्या जीवनात समस्या येण्यास सुरुवात होते.


शनीची सावली, शनीची वक्रदृष्टी, शनीची दशा, साडेसाती आणि शनीची धय्या यापासून केवळ मानवच नव्हे, तर देवही सुटू शकत नाहीत, हे शनि चालिसावरून देखील ओळखलं जातं. पौराणिक कथेनुसार, भगवान शिव देखील शनिदेवाच्या छायेपासून सुटू शकले नाहीत. परंतु, अशा काही राशी आहेत, ज्यांच्यावर शनीची सदैव कृपा असते.


ज्योतिष शास्त्रामध्ये तीन राशींबद्दल सांगण्यात आलं आहे, ज्यांच्यावर शनिदेव मेहरबान आहेत आणि त्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा आहे. या काही राशीच्या लोकांना शनि कधी जास्त त्रास देत नाही. इतर राशींच्या तुलनेत या तीन राशींवर शनीची अशुभ दृष्टी, साडेसाती, धय्या आणि शनिदोषाचा प्रभाव कमी असतो. आता या शनीच्या आवडत्या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


तूळ रास (Libra)


तूळ राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे आणि या राशीत शनि उच्च स्थानी आहे, या कारणास्तव तूळ राशीच्या लोकांवर नेहमी शनिदेवाची विशेष कृपा राहते. शनीची साडेसाती जरी त्यांच्यावर आली तरी त्याचा फारसा प्रभाव त्यांच्यावर पडत नाही. या राशीचे लोक धय्या आणि साडेसाती काळातही चांगली प्रगती करतात. शनीच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना मोठं पद आणि जबाबदाऱ्या मिळत राहतात.


मकर रास (Capricorn)


मकर राशीचे अधिपती स्वतः शनि महाराज आहेत, त्यामुळे मकर राशीच्या लोकांवरही शनिदेवाची विशेष कृपा राहते. मकर राशीचे लोक मेहनती, सक्रिय आणि प्रामाणिक असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांना शनिदेव आपला आशीर्वाद देतात. मकर ही शनिदेवाला प्रिय असलेली रास आहे. शनीच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांची प्रगती होते आणि त्यांना सुख-समृद्धी लाभते. शनीच्या शुभ प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांची स्वप्न पूर्ण होतात.


कुंभ रास (Aquarius)


मकर राशीप्रमाणेच कुंभ राशीचा शासक ग्रहही शनि आहे. कुंभ राशीचे लोक शांत स्वभावाचे असतात आणि त्यांचा कर्मावर जास्त विश्वास असतो. कुंभ राशीचे लोक चांगले कर्म करण्याला प्राधान्य देतात आणि म्हणूनच या राशीच्या लोकांवर शनीची वाईट नजरही पडत नाही. शनिदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामात लवकर यश मिळतं. कुंभ राशीवर शनिदेवाची विशेष कृपा राहते. कुंभ राशीच्या लोकांना कधी पैशाची कमतरता नसते, त्यांना पैसे कमावण्याच्या संधी मिळत राहतात. त्यांना समाजात चांगला मान-सन्मान मिळतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Guru Gochar 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू करणार वृषभ राशीत प्रवेश; 'या' राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण, धनलाभाचेही योग