Guru Rashi Parivartan 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या (Jupiter) राशी बदलाला फार महत्त्व आहे. सुमारे वर्षभर गुरू एकाच राशीत, म्हणजे स्वत:च्या मेष राशीत विराजमान आहे. 1 मे रोजी गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. गुरु ग्रह हा एका राशीत 13 महिने असतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार, 1 मे 2024 रोजी दुपारी 12:59 वाजता गुरू मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 3 मे 2024 रोजी वृषभ राशीतच गुरुचा अस्त होईल. त्यानंतर 12 जूनला गुरू रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरुच्या या मार्गक्रमणामुळे 3 राशींचं भाग्य उजळू शकतं, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं आणि आर्थिक लाभही मिळू शकतो. आता या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीतून बाहेर पडणारा गुरू वृषभ राशीत प्रवेश करणारा आहे, या राशी बदलानंतर गुरू मेष राशीच्या दुसऱ्या घरात जाईल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना अपार यश मिळेल. या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मुलांना लग्नासाठी चांगला जोडीदार मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहून सर्व प्रकारच्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली उंची गाठू शकता. तुमच्या कार्यक्षमतेच्या जोरावर तुम्हाला पदोन्नती मिळू शकते.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या पहिल्या घरात गुरु स्थित असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप शुभ सिद्ध होऊ शकतं. गुरुचा तुमच्या राशीत प्रवेश झाल्याने तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल आणि तुमची दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होतील. यासोबतच तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. आर्थिक लाभासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जायला तयार असाल. या काळात वैवाहिक जीवनातील वाद संपतील.
कर्क रास (Cancer)
या राशीच्या अकराव्या भावात गुरू प्रवेश करेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण झाल्याने सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या काळात तुमच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही. तुमचं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुमचे उत्पन्नही वेगाने वाढेल. समाजात मान-सन्मान वाढेल. भावा-बहिणींसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल आणि तुमच्यामध्ये सुरू असलेले वाद संपतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. मानसिक आणि शारीरिक तणावापासून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :