Shani Amavasya 2023 : हिंदू पंचांगानुसार 17 जानेवारी 2023 या दिवशी शनीने (Shani Dev 2023) कुंभ राशीत प्रवेश केला आहे. कुंभ राशीत शनीच्या परिवर्तनामुळे, शनीची साडेसाती, ढैय्याचा प्रभाव कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर सुरू झाला आहे. दुसरीकडे, कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा, तर मकर राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. 


 


 


शनिदेवाला खूश करण्यासाठी अमावस्येचा दिवस खूप खास
अशा परिस्थितीत यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात सांगितलेला उपाय अत्यंत शुभ सिद्ध होईल. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या शनिवारी येत आहे. म्हणूनच ही शनैश्चरी अमावस्या आहे. 21 जानेवारी 2023 रोजी शनिश्चरी अमावस्या आहे. शनी देवाच्या उपायासाठी अमावस्येचा दिवस खूप खास आहे. शनिवारी अमावस्या येते तेव्हा हा उपाय अधिक फायदेशीर ठरतो.


 



शनैश्चरी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करा


शनि अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून लाकडी चौरंग ठेवून त्यावर काळा कापड पसरवा. त्यावर शनिदेवाची मूर्ती, यंत्र आणि सुपारी ठेवून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिदेवावर अबीर, गुलाल, कुंकू, काजळ लावून त्यांना निळ्या रंगाची फुले अर्पण करा. या दिवशी मोहरीच्या तेलात तळलेल्या पुरी आणि इतर वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. शनिपूजेदरम्यान शनि मंत्राचा 5, 7, 11 किंवा 21 वेळा जप करा आणि शनि चालिसाचा पाठ करा. शेवटी शनिदेवाची आरती करायला विसरू नका. धार्मिक मान्यतेनुसार, मौनी अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने माणसाचे सर्व दोष दूर होतात, त्याला स्वर्ग लोकात स्नान मिळते. या दिवशी उपवास, नैवेद्य आणि दान केल्याने अशक्य असलेली कामेही पूर्ण होतात.



शनि अमावस्येचे महत्त्व


ज्योतिषांच्या मते, जवळपास 20 वर्षांनंतर मौनी अमावस्या शनिवारी असताना असा योगायोग घडला आहे. यासोबतच 30 वर्षांनंतर या अमावस्येच्या दिवशी शनिदेव कुंभ राशीत विराजमान होणार आहेत. हिंदू धर्मात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे पुण्य मिळते. शनि अमावस्येला शनिदेवाची पूजा करावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होऊन त्यांच्या कर्माचे फळ भक्तांना देतात. यासोबतच साडेसाती आणि ढैय्यात आराम मिळतो.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Mauni Amavasya 2023 : वर्षातील पहिल्या अमावास्येला करा 'हे' काम, दूर होईल शनीची पीडा! जाणून घ्या कथा आणि महत्त्व