Vastu Tips For Tulsi : हिंदू धर्म मान्यतेनुसार, तुळशीच्या (Tulsi) रोपाचं विशेष महत्त्व आहे. हे रोप पवित्र असण्याबरोबरच पूजनीय देखील मानले जाते. साधारण प्रत्येक हिंदू घरात तुळशीचं रोप आढळून येते. सकाळ-संध्याकाळ या रोपाची पूजा देखील केली जाते. वास्तूनुसार (Vastu Tips), घरात तुळशीचं रोप लावणं शुभ की अशुभ या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
देवी लक्ष्मीची कृपा राहते
हिंदू धर्म मान्यतेनुसार, स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. तर, तुळशीच्या रोपात लक्ष्मी देवीचा वास असतो. अशातच जर तुम्ही स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावत असाल तर त्यामुळे तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता असते. असे केल्याने साधकावर देवी अन्नपूर्णासह लक्ष्मी देवीची देखील कृपा राहते.
'या' दिशेची काळजी घ्या
जर तुम्ही स्वयंपाकघरात उत्तर दिशेला तुळशीचं रोप ठेवत असाल तर, यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळण्याची शक्यता असते. त्याचबरोबर दररोज तुळशीच्या रोपाची पूजा देखील करा. तसेच, रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीत जल अर्पण करू नका. तसेच, या दिवशी तुळशीची पाने देखील तोडणे चुकीचे आहे.
'या' गोष्टीची देखील काळजी घ्या
जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावत असाल तर, या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. अन्यथा तुम्हाला याचे शुभ फळ मिळणार नाही. तुळशीच्या रोपाजवळ कधीच घाण साचू देऊ नका. तसेच, खरकटी भांडीसुद्धा तुळशीच्या रोपाजवळ ठेवू नयेत. तुमच्या या चुकांमुळे घरात वास्तूदोष निर्माण होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा :