Scorpio Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑगस्ट महिन्यातला शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृश्चिक राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या. 


वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Life Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रेमसंबंधांच्या दृष्टीने चांगला असणार आहे. या काळात तुमच्या नात्यात प्रेम आणि उत्साह वाढलेला दिसेल. लव्ह लाईफ तुमची फार रोमॅंटिक असेल. तसेच, नात्यात अनेक आव्हानांसह चॅलेंजेस देखील येतील. जोडीदाराबरोबर भावना व्यक्त करायला लाजू नका. नातं बहरेल. 


वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात चांगली असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल. प्रोफेशनल लाईफ तुमची फार चांगली असणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. जर तुम्हाला नोकरी चेंज करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नवीन संधी मिळत राहतील. 


वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)


तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. 


वृश्चिक राशीचे आरोग्य (Scorpio Health Horoscope)


या आठवड्यात स्त्रियांना आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अजिबात हलगर्जीपणा करु नका. संतुलित आहार घ्या. जास्त बाहेरचे आणि तेलकट पदार्थ खाऊ नका. तसेच, मदयपदार्थांचं  सेवन अजिबात करू नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Libra Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : नवीन आठवडा तूळ राशीसाठी महत्त्वाचा, आयुष्यात घडतील मोठे बदल फक्त इतरांवर विश्वास ठेवू नका; साप्ताहिक राशीभविष्य