करिअरच्या बाबतीत वृश्चिक राशीचे लोक आज नित्याची कामे पूर्ण करतील आणि सर्व काही सामान्यपणे चालेल. आज तुम्हाला पैशांबाबत कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कोणालाही कर्ज देऊ नका आणि नातेवाईकांशी व्यवहार करू नका. कामाशी संबंधित कामांमध्ये व्यवसायाला गती मिळेल आणि संध्याकाळ चांगली जाईल. काही प्रिय मित्रांकडून मदत मिळू शकते. रिअल इस्टेट आणि बांधकामाशी संबंधित व्यवसाय सुरळीत चालतील. नोकरी व्यवसायातील कर्मचारी दिवसभर व्यस्त आणि धावपळीत राहतील.
वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कुटुंबात काही धार्मिक कार्य आयोजित केलं जाऊ शकतं. तसेच, घरी पूजा, हवन, होम केला जाऊ शकतो. काही आध्यात्मिक चर्चा होऊ शकते. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
आज वृश्चिक राशीचे आरोग्य
आज वृश्चिक राशीचे आरोग्य चांगले असेल पण तुम्हाला सतत आजारी असल्यासारखे वाटेल. शरीरात दिवसभर थकवा जाणवेल. कामाच्या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घ्या.
वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय
केळीच्या झाडाची पूजा करा आणि गरिबांना पिवळे कपडे आणि अन्न दान करा. आज लक्ष्मीदेवीला लाल फुले अर्पण करा.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :