Sarva Pitri Amavasya 2022 : आज 25 सप्टेंबर, रविवार हा पितृ पक्षाचा (Pitru Paksh) शेवटचा दिवस आहे. त्याला सर्वपित्री अमावस्या 2022 असे म्हणतात. या दिवशी पितरांचे श्राद्ध, तर्पण वगैरे केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो, असे धार्मिक ग्रंथात लिहिले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूर्वज आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी काही कामं चुकूनही करू नये, नाहीतर पितरांना राग येऊ शकतो. जाणून घ्या, सर्वपित्री अमावस्येला कोणत्या गोष्टी करू नयेत..

Continues below advertisement

सर्वपित्री अमावस्येला कोणत्या गोष्टी करू नयेत

1. सर्वपित्री अमावस्येला केस कापू नका किंवा मुंडण करू नका. तसेच या दिवशी नखे कापू नयेत. श्राद्ध पक्षात ही कामे करण्यास मनाई आहे. त्यामुळे सर्व पितृ अमावस्येलाही हे काम करू नये. धार्मिक ग्रंथानुसार असे केल्याने पितरांना राग येऊ शकतो.

Continues below advertisement

2. सर्वपित्री अमावस्येला लसूण-कांदा इत्यादी तामसिक गोष्टी खाऊ नयेत. याशिवाय हरभरा, काळे उडीद, काळे मीठ, मोहरी इत्यादी खाऊ नयेत. या सर्व गोष्टी श्राद्ध विधीत निषिद्ध मानल्या जातात, म्हणजेच श्राद्ध करताना या सर्व गोष्टी खाऊ नयेत.

3. वायु पुराणानुसार श्राद्ध पक्षात मांस आणि मद्य सेवन टाळावे अन्यथा पितरांना राग येतो. अमावस्या तिथीला या गोष्टी विशेष लक्षात ठेवाव्यात. अन्यथा, भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

4. श्राद्ध पक्षातील अमावस्येच्या दिवशी शरीरावर तेल मालिश करू नये. यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामापासून दूर राहावे.

5. धार्मिक ग्रंथानुसार श्राद्ध पक्षातील अमावास्या खूप खास असते. या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. हे व्रत केवळ शारीरिकच नव्हे तर मनाने आणि वचनानेही केले पाहिजे. या दिवशी सात्त्विकतेचे पालन केल्याने पितर प्रसन्न होतात.

6. नियमानुसार लोखंडी आसनावर बसून श्राद्ध करू नये. रेशीम, घोंगडी, लाकूड, कुशा इत्यादींनी केलेली आसने उत्तम आहेत.

7. या दिवशी एखादी व्यक्ती अन्नाच्या अपेक्षेने तुमच्या घरी आले तर त्याला रिकाम्या हाताने परत करू नका. अन्न नसेल तर जे काही उपलब्ध असेल ते त्याला द्यावे.

8. सर्व पितृ अमावस्येला कोणत्याही गरीब किंवा असहाय व्यक्तीची चेष्टा करू नका. जर अशी व्यक्ती समोर आली तर त्याला शक्य तितक्या मदत करण्याचा प्रयत्न करा.

इतर महत्वाच्या बातम्या

Navratri 2022: नवरात्रीत लग्नासाठी वधू किंवा वर पाहत असाल, तर शुभ मुहूर्त जाणून घ्या

Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय