Samsaptak Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ (Mars) ग्रहाने बुध ग्रहाच्या कन्या राशीतून संक्रमण केलं आबहे. या ठिकाणी राहू ग्रह विराजमान आहे. तर, शनि महाराज (Shani Dev) देखील वक्री अवस्थेत मीन राशीत आहेत. वैदिक शास्त्रानुसार, कन्या राशीत मंगळ आणि मीन राशीत शनीच्या दरम्यान दृष्टी संबंध जुळून येणार आहे. यामुळे समसप्तक नावाचा योग निर्माण होणार आहे. हा योग तब्बल 30 वर्षांनंतर निर्माण झाला आहे.
शास्त्रानुसार, मंगळ आणि शनीच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या योगाचा 4 राशींवर परिणाम होणार आहे. या 4 राशींसाठी हा काळ फार कठीण ठरु शकतो. त्यामुळे या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
मंगळ-शनीमुळे निर्माण होणारा समसप्तक योग वृषभ राशीसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात कोणताही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. तसेच, या काळात कोणतीही देवाण-घेवाण करु नका. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. वृषभ राशीच्या लोकांना मंगळ-शनीच्या युतीमुळे येणाऱ्या काळात अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ-शनिचा समसप्तक योग अनेक समस्या घेऊन येणारा असणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनावर काही परिणाम होऊ शकतो. तसेच, तुम्हाला कामाच्या ठिकाणी मानसिक तणावाचा देखील सामना करावा लागू शकतो. बिझनेसमध्ये अनेक प्रकारच्या अडचणींना तुम्हाला समोरं जावं लागेल.
सिंह रास (Leo Horoscope)
मंगळ-शनिच्या समसप्तक योगामुळे सिंह राशीच्या लोकांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागेल. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत देखील सतर्क असण्याची गरज आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मानसिक ताण जाणवेल. कामाचा देखील ताण वाढणार आहे. या काळात कोणालाही पैसे उधारी देऊ नका.
वृश्चिक रास (Scorpio Horocsope)
मंगळ-शनिचा समसप्तक योग वृश्चिक राशीसाठी फार अडचणींचा असार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडताना दिसतील. तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर तुमचे संबंध बिघडतील. तसेच, खर्चात अनपेक्षितपणे वाढ होऊ शकते. यासाठी पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करु नका. कामाच्या बाबतीत देखील प्रामाणिक राहा. कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :