Horoscope Today 30 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 29 जुलै 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. कारण आज श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमीचा दिवस आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज संबंधित व्यक्तींचा संपर्क वाढवणे कायद्याचे ठरेल, कोणत्याही आजारासाठी औषध घेताना त्या चुकीचे घेत नाही ना याची खातर जमा करावी.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल, जोडीदाराच्या लहरी आणि विकसित वागण्याचा थोडा त्रास होईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज नवीन योजना आखाल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी कामही चालू कराल, परदेशागमनाचे योग संभवतात
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज महिलांना मानसिक शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, परंतु आज आत्मविश्वास वाढणार आहे
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज कोणतेही काम करताना कामाची उत्तम आखणी आयोजन आणि संयोजन याबाबतीत तुमचा हात कोणी धरणार नाही
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज लोकांसमोर तुमच्यामध्ये असलेले कर्तृत्व दाखवण्यात तुम्ही अजिबात कमी पडणार नाही, जवळच्या व्यक्तींकडून मदत मिळणार नाही
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज परिस्थितीचा थोडा आढावा घेऊन त्याप्रमाणे पावले उचलाल, तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश लागेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आपला आवडता जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मिळेल, आपल्या बुद्धीच्या जोरावर मी मी म्हणणाऱ्यांना धडा शिकवाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज खूप दिवसांपासून लांबणीवर पडलेले काम मार्गी लागेल, महिला आपल्या व्यासंग वाढवतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो पूर्वतयारी शिवाय कोणतीही गोष्ट न करण्याच्या तुमच्या गुणांचा आज उपयोग होईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमचे विचार खूप पुढे धावतील, उत्तम बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व कामे पार पडाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज शेअर्स किंवा त्या प्रकारची गुंतवणूक करताना, स्वतःच्या मर्यादेचे भान ठेवा, नाहीतर तोटा सहन करावा लागेल.
हेही वाचा :
August 2025 Astrology: ऑगस्टमध्ये 'या' 6 राशींच्या नोकरीचं टेन्शन संपेल! प्रमोशन, पगारात घसघशीत वाढ, तुमची रास कोणती? ज्योतिषी म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)