Astrology Panchang Yog 30 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 30 जुलै 2025 चा दिवस आहे. आज चंद्राने कन्या राशीत संक्रमण केलं आहे. तसेच, आजच्या दिवशी धन योगाची (Yog) सुद्धा प्राप्ती झाली आहे. त्याचबरोबर, सूर्य आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे बुधादित्य नावाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्याचबरोबर, हस्त नक्षत्राच्या संयोगाबरोबरच सिद्धी आणि सर्वार्थ योग निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस उमेदीचा असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगली क्रिएटिव्हीटी दिसून येईल. तसेच, तुम्हाला अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. आजच्या दिवशी मनोरंज क्षेत्रातील लोकांना चांगला लाभ मिळेल. प्रामाणिकपणाचं फळ तुम्हाला मिळेल. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याआधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. समाजातील खास प्रभावशाली लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. मित्रांचा चांगला सपोर्ट तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन गोष्टी करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस फार सौभाग्यशाली असणाप आहे. जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट पाहायला मिळेल. तसेच, व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, परदेशात जाण्याती संधी लवकरच चालून येईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या करिअरला नवी दिशा मिळेल. तसेच, व्यवसायात तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. तुमचा दिवस अनुकूल असार आहे. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. हातात घेतलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी उद्याचा दिवस फार सकारात्मक असणार आहे. मुलांच्या कलात्मक गुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमचे वैवाहिक जीवन फार चांगले असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Astrology : रागीट, हट्टी आणि भयंकर डॉमिनेटिंग असतात 'या' 4 राशींचे लोक; स्वत:चंच म्हणणं खरं करण्याची असते सवय, वाचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये