Samsaptak Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनं संक्रमण करतात. ग्रहांच्या संक्रमणाचा प्रत्येक राशीवर शुभ-अशुभ परिणाम होतो. तसेच, मानवी जीवनावरही याचा प्रभाव दिसून येतो. ग्रहांचा राजा सूर्याने (Surya) आज म्हणजेच 17 सप्टेंबर 2025 रोजी कन्या राशीत प्रवेश केला आहे. या दरम्यान सूर्य मीन राशीत विराजमान आहे. त्यामुळे शनीसह (Shani Dev) समसप्तक योग जुळून येणार आहे. सूर्य आणि शनि एकमेकांच्या सातव्या स्थानी स्थित होऊन सपसप्तक योग निर्माण झाला आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्याने 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 1 वाजून 54 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश केला आहे. आता 17 ऑक्टोबरपर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. त्यामुळे मीन राशीत विराजमान असलेले सूर्य-शनी एकमेकांच्या समोरासमोर असतील. यामुळ समसप्तक योग निर्माण होणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
या राशीच्या सहाव्या स्थानी सूर्याचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे आहेत. समसप्तक योगामुळे तुम्हाला काही अडचणीही येतील. यासाठी कुठे ट्रान्सफर करताना काळजी घ्या. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ रास (Taurus Horoscope)
सध्या सूर्य या राशीच्या पाचव्या चरणात संक्रमण करणार आहे. सूर्य या राशीच्या चौथ्या चरणाचे स्वामी आहेत. त्यामुळे या राशीच्या कर्म योगात समसप्तक योग जुळून येणार आहे. ग्रहांची स्थिती जरी अनुकूल असली तरी तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही जबाबदारीचा आणि आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या काळात गुंतवणूक करणं टाळा. तसेच, आर्थिक बाबतीत निर्णय घेताना सावधानता बाळगा.
मिथुन रास (Gemini Horoscope)
या राशीच्या चौथ्या चरणात सूर्य ग्रह संक्रमण करणार आहे. यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. तसेच, अपघातासारखे परिणाम घडू शकतात. सूर्य-शनिचा समसप्तक योगामुळे तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, समाजातील अनेक क्षेत्रांचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कोणतंही काम हाती घेताना सतर्कता बाळगा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :