Numerology Of Mulank 8 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज म्हणजेच 17 सप्टेंबर 2025 रोजी वाढदिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 75 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. अंकज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, नरेंद्र मोदी यांचा मूलांक 8 आहे. त्यानुसार मूलांक 8 चे लोक राजकारणात फार नाव कमावतात. तसेच, या मूलांकाचं (Mulank) आणखी काय वैशिष्ट्य आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.
अंकज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 चा स्वामी ग्रह शनी आहे. या जन्मतारखेच्या लोकांवर शनिदेवाचा प्रभाव असल्या कारणाने हे लोक फार हुशार असतात. यांच्यामध्ये शनिदेवासारखे अनेक गुण असतात. जसे की, या जन्मतारखेचे लोक फार मेहनती, तत्त्वनिष्ठ, न्याय आणि निष्पक्षता प्रिय असतात.
फार मेहनती आणि प्रामाणिक असतात
या जन्मतारखेचे लोकांचा प्रवास फार प्रेरणादायी असतो. आयुष्यात एका ठराविक टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी यांना फार स्ट्रगल करावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वातही हे गुण दिसतात. या जन्मतारखेचे लोक फार मेहनती आणि प्रामाणिक असतात.
नशिबावर नाही तर स्वत:च्या कर्माने पुढे जातात
या जन्मतारखेच्या लोकांमध्ये एक विशेष वैशिष्ट्य असतं. ते म्हणजे, हे लोक कधीच नशिबावर अवलंबून नसतात. ते नेहमीच आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे शनिदेवाची या लोकांवर विशेष कृपा असते. या जन्मतारखेच्या लोकांमध्ये भयंकर लीडरशिप क्वालिटी असते.
साधी राहणी उच्च विचारसरणी
या जन्मतारखेच्या लोकांची साधी राहणी उच्च विचारसरणी असते. या लोकांना दिखावा कधीच भावत नाही. तसेच, भौतिकता आणि आध्यात्मिकतेमध्ये समतोल राखणं यांना चांगलं जमतं.
मूलांक 8 शी वेगळं कनेक्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस मूलांक 8 शी जोडण्यात आला आहे. या व्यतिरिक्त या मूलांकाशी मोदींचं खास कनेक्शन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हाची तारीख 8 होती. तसेच, पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ तारीख, नोटाबंदीची तारीख यांसारखे महत्त्वाचे निर्णय पंतप्रधानांनी 8 तारखेलाच घेतले आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :