बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावरती आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. नव्याने उभारण्यात आलेल्या काही विभागाची अजित दादांनी पाहणी केली. काही नियोजित न झालेल्या कामावरून दादांनी डॉक्टरांचीच कान उघडणी केली. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या जिथल्या तिथे ऍक्युरेट केल्या पाहिजेत.. तिथे पण काही तरी झालं एसीच्या खाली काय आहे.. डॉक्टर म्हणतात सिमेंट व्यवस्थित लागलं नाही.. तर मी लावायला येतो, आज दुपारी वेळ काढतो.. हे काम तुमचे नाहीत पीडब्ल्यूडीचे आहे.. असं म्हणत अजितदादांनी अधिकाऱ्यांसह डॉक्टरांची पण कान उघडणी गेली. आपण त्यांना पैसे देतो... काही चांगल्या कामावरून दादांनी कौतुक केले. मात्र अधिकाऱ्यांना देखील झापले... तुम्ही खास करून माझे पाहुणे नाहीत कोणीही बूट आणि चप्पल घालून आत यायचे नाही.. असे म्हणत सकाळीच अधिकाऱ्यांवर दादांचा पारा चढलेला दिसला.

Continues below advertisement

नेमकं काय घडलं?

अजित पवारांनी नवीन झालेल्या कामाची पाहणी करत होते, त्यावेळी एका ठिकाणी भिंतीवरती त्यांना सिमेंट आणि एसीच्या खालच्या बाजुला थोडा भाग व्यवस्थित लागला नसल्याचं दिसून आलं. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, जो अचूकपणा असतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. फक्त त्या जिथल्या तिथं करायच्या असतात. भिंतीवर तिथं काय झालंय, एसीच्या खाली? तिथे उपस्थित असणाऱ्यांपैकी कोणीतरी उत्तर दिले सिमेंट दिसते, सिमेंट व्यवस्थित झालेलं नाही आहे. त्यावेळी अजित पवार म्हणाले, आज दुपारी मी वेळ काढतो आणि तिथे मी लावायला येतो आणि मी टचअप करायला येतो. हे काम तुमचं नाही. जे कोणी पीडब्ल्यूडीचे इंजिनिअर वगैरे आहे, त्यांची ही कामे आहेत. त्यांना आपण पैसे देतो. महिन्याच्या महिन्याला आपण त्यांना पगार देतो. मी ही डॉक्टरांची काम आहेत तसं म्हणणारच नाही. त्यांच्याकडून आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो, त्यांची ही कामे आहेत. दरवाज्याची उंची चांगली दिली. बरंच चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलाय. त्याबद्दल दुमत नाही. त्याबद्दल मी समाधानी आहे. पण बारीक सारीक गोष्टी राहिल्या आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली व ध्वजारोहण सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज 17 सप्टेंबर रोजी बीड येथे हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा आणि ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रियदर्शनी उद्यान येथे सकाळी 8.25 वाजता हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार असून सकाळी 9.00 वाजता पोलीस मुख्यालय मैदान, बीड येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार ध्वजारोहण करून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

Continues below advertisement