Sagittarius Horoscope Today 08 June 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या (Job) शोधात फिरतायत, त्यांना मित्रांच्या (Friends) मदतीने चांगली नोकरी मिळू शकते. कौटुंबिक (Family) जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर नवीन व्यवसाय (Business) सुरू करण्याचा विचार करू शकता. आज तुमचे काही नवीन संपर्क वाढतील. परंतु, दैनंदिन कामात हलगर्जीपणा करू नका. सरकारी कामांनाही आज गती मिळेल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुम्हाला एखाद्या विशेष कार्यक्रमांतर्गत अडकलेले पैसे मिळतील. तुमचे मन प्रसन्न राहील, तुमचा कल आज श्रद्धा, धर्म आणि अध्यात्माकडे जाईल. समाजसेवेशी निगडित विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा आज वाढेल आणि तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. तसेच, आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याचीही संधी मिळेल.
धार्मिक विधींमध्ये सहभागी व्हा
धनु राशीच्या लोकांना आज त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्यात परोपकाराची भावना विकसित होईल. धार्मिक विधींमध्ये परिश्रमपूर्वक काम करा, ज्यामुळे तुमच्या मनातील श्रद्धा वाढेल. संध्याकाळी आरोग्याशी संबंधित समस्येला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे आतापासूनच सावधगिरी बाळगा आणि खाण्यापिण्यावर संयम ठेवा.
धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
धनु राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, आज तुमच्या कुटुंबात सुख-शांती राहील. घरात पाहुण्यांची ये-जा सुरु राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबीयांबरोबर धार्मिक कार्याच्या स्थळी घालवा. यामुळे तुमच्या मनालाही शांती मिळेल आणि एकोपाही जपला जाईल.
आजचे धनु राशीचे आरोग्य
धनु राशीच्या लोकांना आज पाठदुखीची समस्या भासू शकते. भुजंग आसन केल्याने खूप फायदा होईल. तसेच, कामाच्या दरम्यान थोडा वेळ विश्रांती देखील घ्या. तुम्हाला आराम मिळेल.
धनु राशीसाठी आजचे उपाय
आज तीन झाडू खरेदी करा आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जवळच्या मंदिरात ठेवा.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :