National Best Friend Day 2023 : आयुष्यात रक्ताची नाती फार महत्त्वाची असतात पण त्याहूनही सर्वात खास नातं असतं ते मैत्रीचं. मैत्रीच्या नात्याला कोणतीच बंधनं लागू होत नाहीत. सुख असो किंवा दु:ख आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मित्राचा मदतीचा हात कायम पुढे असतो. अशाच मित्रांविषयी प्रेम, आदर व्यक्त करणारा दिवस म्हणजे नॅशनल बेस्ट फ्रेंड डे (National Best Friend Day). या दिनाचा इतिहास नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
नॅशनल बेस्ट फ्रेंड डेचा इतिहास नेमका काय?
नॅशनल बेस्ट फ्रेंड डे सर्वात आधी 1935 मध्ये साजरा करण्यात आला. 1935 मध्ये हा दिवस यूएस काँग्रेसने प्रस्तावित केला होता. हा दिवस जवळच्या मित्रांना श्रद्धांजली तसेच प्रेम अर्पण करण्यासाठी साजरा करण्यात आला. तेव्हापासून, 8 जून हा नॅशनल बेस्ट फ्रेंड डे म्हणून साजरा करण्यात आला. आज जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय बेस्ट फ्रेंड डे दिनाचं महत्त्व (National Best Friend Day Importance)
आपल्या आयुष्यात मैत्रीचं जे स्थान आहे ते कोणीच घेऊ शकत नाही. कठीण परिस्थितीतही आपल्याला समजून घेणारा, सावरणारा मैत्रीचा हात प्रत्येकासाठी वेगळा असतो. काही लोकांसाठी मैत्री म्हणजे जवळचा मित्र परिवार असू शकतो तर काही लोकांसाठी आपलं कुटुंब हाच त्यांचा मित्र परिवार असतो. काही लोक आपल्या भावंडांना आपला बेस्ट फ्रेंड मानतात तर काहींसाठी त्यांचे पाळीव प्राणीच त्यांचे बेस्ट फ्रेंड्स असतात.
मैत्री का महत्त्वाची आहे?
भावनिक आधार : आपल्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात एक चांगला मित्र आपल्या बरोबर असतो. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अशा आधाराची गरज असते.
आत्मसन्मान वाढवण्यासाठी : प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते ज्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे वाटत असता. ज्याला तुमचं मत समजून घेणं महत्त्वाचं वाटत असतं. आपल्या मताचा मान राखणारा असा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवा.
प्रामाणिक मत : खरा मित्र तो असतो जो फक्त तुमच्यासमोर नाही तर तुमच्या मागूनही तुमचं कौतुक करत असतो. खरा मित्र तो असतो जो तुम्हाला खोटं प्रोत्साहन देत नाही आणि प्रामाणिक मत व्यक्त करतो. असा मित्र देखील प्रत्येकाच्या आयुष्यात हवा असतो.
महत्त्वाच्या बातम्या :