Rang Panchami 2024: होळी  झाल्यनंतर वेध लागतात ते रंगपंचमीचे (Rang Panchami 2024)... होळी (Holi) झाल्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमीला देवपंचमी असे देखील म्हणतात. या दिवशी देवतांसह होळी खेळली जाते. हा सण दरवर्षी होळीनंतर शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तिथी 30 मार्च शनिवारी आहे. रंगपंचमीला रंग किंवा गुलाल उधळण्याची परंपरा आहे. रंगपंचमीच्या दिवशी मित्र, नातेवाईक गुलाल आणि विविध रंगानी रंगपंचमी खेळतात.


रंगपंचमी हा सण होळीचे शेवटचे पर्व मानले जाते. शास्त्रानुसार देवी-देवतांना समर्पित रंगपंचमीच्या या सणाला देव पंचमी असेही म्हणतात. कारण सर्व देव या दिवशी रंगोत्सव साजरा करतात अशी एक आख्यायिका आहे. हा सात्विक पुजेचा दिवस आहे. रंगपंचमी धनदायक मानली जाते. विविध रंगामुंळे वाईट गुणांचा नाश होतो आणि कुंडलीतील सर्व दोष नाहीशे होतत. या दिवशी देवी-देवता एकत्र होळी खेळतात तेव्हा सुख, समृद्धी आणि वैभवाचा आशीर्वाद देतात. रंगपंचमीच्या दिवशी देवी-देवताही पृथ्वीवर येतात आणि सर्वसामान्यांसोबत रंग-गुलाल खेळतात.  या दिवशी सर्वत्र निर्मळ वातावरण असते. या देवी देवता आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. 


रंगपंचमी शुभ मुहूर्त


रंगपंचमी सण - 30 मार्च, शनिवार


पंचमी तिथीची सुरुवात – 29 मार्च, रात्री 08 वाजता 


पंचमी तिथीची समाप्ती – 30 मार्च रात्री  09 वाजून 31 मिनिटे 


देवांसोबत रंग खेळण्याचा मुहूर्त – सकाळी 07 वाजून 46  मिनिट ते 09 वाजून 19 मिनिटांपर्यंत.


काय आहे आख्यायिका?


रंगपंचमीच्या संबंधी एक पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की, होलाष्टकाच्या दिवशी जेव्हा भगवान शंकराने कामदेवाला जाळून राख केले होते. तेव्हा संपूर्ण देवलोकात शोक पसरला होता. सर्व दवी देवतांना चिंता वाटू लागली की कामदेवाशिवाय जग कसे चालवायचे. त्यानंतर सर्वांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. परमेश्वराने देवतांची प्रार्थना स्वीकारली आणि कामदेवाला पुन्हा जिवंत केले. असे केल्याने संपूर्ण देवलोकातील देवता प्रसन्न झाले आणि रंगोत्सव साजरा करु लागले. तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


निसर्गाची किमया न्यारी! तुकाराम बीजेला देहूत 12 वाजता वातावरण होते स्तब्ध, जाणून घ्या वैकुंठ गमनाच्या वेळी नेमकं काय घडते?