Ram Navami Wishes In Marathi : हिंदू पंचागानुसार, चैत्र शुद्ध नवमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो. या तिथीला भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला ‘रामनवमी’ असं म्हणतात. रामभक्त रामनवमी सणाची (Ram Navami 2024) आतुरतेने वाट पाहत असतात.


यंदा राम नवमी 17 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. राम नवमी हा हिंदू धर्मातील पवित्र सण मानला जातो.  या दिवशी एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या जातात. यंदाच्या रामनवमीला तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना मराठीमध्ये रामनवमीचे संदेश पाठवून खास शुभेच्छा (Ram Navami Wishesh In Marathi) देऊ शकता.


राम नवमी शुभेच्छा संदेश (Ram Navami Wishesh In Marathi)


आयोध्याचे वासी राम,
रघूकुळाची ओळख राम,
पुरुषांमध्ये आहे उत्तम राम,
सदा जपावे हरीचे नाम,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


ज्यांचा कर्म धर्म आहे,
ज्यांची वाणी सत्य आहे,
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे…
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!


उद्धार होईल त्याचा जो घेईल प्रभूचे नाव
जय जय जय श्रीराम
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!


छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


श्रीराम नावाचा अर्थ जो जाणत नाही,
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात श्रीराम नाही,
तो सगळ्यात मोठा दुर्भागी,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


चैत्रमास, त्यात शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती!
दोन प्रहरीं कां ग शिरीं सूर्य थांबला
राम जन्मला ग सखी राम जन्मला
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!


वाईटाचा त्याग कर, सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही.
देव तुम्ही, हनुमान तुम्ही,
अडचणींना दूर करणारे तुम्ही.
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!


प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा


श्री रामाचा वंशज आहे, गीता माझी गाथा आहे,
छाती ठोकून सांगतो, भारत माझी माता आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


हाताने केलेलं दान आणि मुखाने घेतलेलं श्रीराम प्रभूचं नाव कधी व्यर्थ जात नाही
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


हेही वाचा:


Ram Navami 2024 : रामनवमीला अवघ्या 2 तास 33 मिनिटांचा शुभ मुहूर्त; संपूर्ण पूजा-विधी आणि उपाय जाणून घ्या