Raksha Bandhan 2025 : शास्त्रानुसार, रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण नुकताच झाला आहे. बहिणींनी भावाच्या हाताला राखी बांधून भावाच्या भरभराटीसाठी, सुखासाठी प्रार्थना केली तसेच भावाने देखील बहिणीच्या संरक्षणाची सर्व वचनं देऊन झाली आहे. राखी हे त्याचं प्रतीक आहे. मात्र, रक्षाबंतधनानंतर राखी नेमकी कधी काढावी? असा अनेकांना प्रश्न पडतो. याच संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी सविस्तर माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात. 

Continues below advertisement


ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, राखी कधीही त्वरित काढू नये. राखी किमान जन्माष्टमीपर्यंत बांधून ठेवावी. हे लक्षात ठेवा की, पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच राखी काढावी. कारण या काळात जर तुम्ही राखी बांधून ठेवली तर ती अशुद्ध मानली जाते. अशुद्ध वस्तू धारण करू नयेत.


अनेक लोक राखी काढून ती घरात कुठेही ठेवतात, पण असे करणे चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही राखी काढता, तेव्हा हे लक्षात ठेवा की ती कचऱ्यात जाऊ नये. राखी काढून ती सुरक्षित जागी ठेवावी किंवा नंतर ती एखाद्या झाडाला बांधावी.


कधी कधी हातात बांधलेली राखी तुटते आणि भाऊ ती काढून फेकून देतात, पण असे करू नये. शास्त्रानुसार तुटलेली राखी अशुभ मानली जाते. तुटलेली राखी पाण्यात विसर्जित करावी किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवावी. असे करताना 1 रुपयाचा नाणे ठेवणे आवश्यक आहे.


राखी काढण्याची योग्य प्रक्रिया (वैदिक पद्धत)


राखी काढणे हीसुद्धा एक छोटा पण महत्त्वाचा विधी आहे, कारण राखी केवळ एक धागा नसून त्यात भावनात्मक, धार्मिक आणि ऊर्जात्मक बंध असतो. चुकीच्या पद्धतीने काढल्यास त्या ऊर्जेचा अपमान मानला जातो.


1. योग्य वेळ निवडा


राखी ताबडतोब काढू नये.
साधारण जन्माष्टमीपर्यंत (कृष्ण जन्मोत्सव) राखी ठेवणे शुभ मानले जाते.
पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी राखी काढणे आवश्यक आहे.


2. काढण्यापूर्वी पूजा करा


स्वच्छ हाताने, बसून किंवा उभे राहून देवाचा किंवा कुलदेवतेचा स्मरण करा.
भावंडाचे नाव मनात घेऊन त्याच्या दीर्घायुष्य व सुखासाठी प्रार्थना करा.


3. काढण्याची पद्धत


राखी स्वतः ओढून काढू नये; शक्यतो कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा आईने काढावी.
राखी हळूच उलगडून (गाठ न तोडता) काढावी.


4. काय करावे राखीसोबत


राखी कधीही कचर्‍यात टाकू नये.
खालील पैकी कोणताही पर्याय निवडा:
एखाद्या पवित्र नदी/तलावात विसर्जन करा.
एखाद्या झाडाच्या मुळाशी (विशेषतः पीपळ, वड किंवा तुलशी) बांधा.
विसर्जन किंवा बांधणी करताना 1 रुपयाचे नाणे किंवा थोडा गूळ ठेवणे शुभ मानले जाते.


5. काढल्यानंतर प्रार्थना


“बंधनमुक्त” होताना मनात म्हणा –
“हे बंधन सदैव संरक्षण देत राहो, आणि माझ्या जीवनात सुख-शांती राहो.”


डॉ. भूषण ज्योतिर्विद


हे ही वाचा :


Numerology : 'भोला भाला सा, सीधा साधा सा'....'या' जन्मतारखेचे लोक असतात फारच साधेभोळे; कोणीही सहज दुखवू शकतं, प्रेमातही कन्फ्युजन