Numerology Of Mulank 2 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक राशींप्रमाणे अंकशास्त्राालाही (Ank Shastra) तितकंच महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार, त्याची स्वभाव वैशिष्ट्ये, आवडी निवडी आणि भविष्याबाबत काही गोष्टींचा अंदाज लावता येतो. प्रत्येक मूलांकाची (Mulank) काही वैशिष्ट्ये असतात. त्याचप्रमाणे आज आपण मूलांक 2 ची नेमकी वैशिष्ट्ये कोणती ते जाणून घेऊयात.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्राला शीघ्रग्रह मानतात. या जन्मतारखेचे लोक फार कल्पनाशील, भावूक आणि फार साध्या विचारांचे असतात.
कसा असतो स्वभाव?
जगात अशा अनेक भोळ्या व्यक्ती आहेत ज्यांच्या वागण्याचा अनेकदा फायदा घेतला जातो. आज आपण मूलांक 2 विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. या जन्मतारखेचे लोक कोणत्याही संस्थेत काम करण्यास जास्त वेळ टिकत नाहीत. हे लोक फार क्रिएटिव्ह स्वभावाचे असतात. यांचं राहणीमान फार साधं असतं. यांच्या लीडरशिप क्वालिटी सुद्धा पाहायला मिळते. तसेच, हे लोक फार शांत स्वभावाचे असतात. प्रत्येक गोष्टीत हे लोक फार इमोशनल होतात. आपल्याबरोबरच यांना इतरांचीही काळजी असते.
फार चंचल स्वभाव
या जन्मतारखेच्या लोकांचा स्वभाव फार चंचल असतो. यांचं मन फार निर्मळ असतं. कोणाविषयीच मनात द्वेषाची भावना नसते. यांच्या शांत आणि निर्मळ स्वभावामुळे लोक अनेकदा यांचा फायदा घेतात. हे लोक पटकन लोकांच्या बोलण्यात येतात. तसेच, यांच्यात इतरांपेक्षा थोडा कमीच आत्मविश्वास असतो. त्याचा परिणाम अनेकदा यांच्या करिअरवर देखील पाहायला मिळतो. त्यामुळेच इतरांच्या तुलनेत हे थोडे स्लो असतात.
प्रेमाच्या बाबतीत ठरतात अपयशी
या जन्मतारखेचे लोक प्रेमाच्या बाबतीत फार गोंधळलेले पाहायला मिळतात. याच कारणामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचायला यांना फार वेळ लागतो. हीच यांच्यातली सर्वात मोठी कमतरता असते. त्यामुळेच हे लोक प्रेमात आधी पुढाकार घेत नाहीत. यांच्या या स्वभावामुळेच प्रेमात यांना यश मिळत नाही. मात्र, यांचं वैवाहिक जीवन फार सुखी असतं. आपल्या मुलांप्रती यांना खूप जिव्हाळा आणि प्रेम असतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :