Raksha Bandhan 2025: पंचांगानुसार, 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यात येतो, हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या या सणाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला दीर्घायुष्य आणि सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. यावर्षी रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025, शनिवारी आहे. सध्या सोशल मीडियावर राखीच्या रंगाबद्दल एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे या वर्षी तुमच्या भावाला एका विशिष्ट रंगाची राखी बांधू नका, अन्यथा त्याचे जीवन धोक्यात येऊ शकते. यामागील सत्य नेमकं काय आहे? ते जाणून घ्या.


भाऊ - बहिणीच्या सुख - समृद्धीसाठी अनेक उपाय


हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात भाऊ - बहिणीच्या सुख आणि समृद्धीसाठी रक्षाबंधनासाठी अनेक उपाय आणि नियम देखील सांगितले आहेत. यामध्ये राशीनुसार राखी बांधणे याचा देखील समावेश आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी? जाणून घ्या.. 


यंदा रक्षाबंधनला भावाला 'या' रंगाची राखी बांधू नये?


ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 हे वर्ष मंगळाचे वर्ष म्हटले जात आहे. प्रत्यक्षात, जेव्हा तुम्ही 2025 जोडता तेव्हा एकूण संख्या 9 येते. 2+0+2+5=9, 9 या अंकाचा स्वामी मंगळ आहे, म्हणून त्याला मंगळाचे वर्ष म्हटले जात आहे. मंगळ हा धैर्य, आत्मविश्वास, ऊर्जा, क्रोध यांचा ग्रह आहे. तसेच, लाल रंग मंगळाचे प्रतिनिधित्व करतो. असे म्हटलं जातंय की, मंगळाच्या या वर्षी तुमच्या भावाला लाल राखी बांधल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा मोठे नुकसान होऊ शकते. अशी चूक केल्यास दुर्दैव येऊ शकते. म्हणून, या वर्षी रक्षाबंधनावर तुमच्या भावाला लाल रंगाची राखी बांधू नका. यामागील नेमकं सत्य काय? जाणून घ्या..


नेमकं सत्य काय?


काही ज्योतिषींच्या मते, लाल रंगाची राखी न बांधण्याची चर्चा इंटरनेटवर फिरत असेल पण त्यात काहीही तथ्य नाही. याउलट, सनातन धर्मात लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. सहसा, हातात बांधला जाणारा धागा देखील लाल किंवा पिवळ्या रंगाचा असतो. भावाला लाल रंगाची राखी बांधण्यात कोणतीही अडचण नाही आणि कोणतीही चिंता न करता लाल रंगाची राखी बांधता येते.


हेही वाचा :           


Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचे भाग्य घेऊन येतायत! धनलक्ष्मी योगाने होणार चमत्कार, श्रीमंतीचे योग, साप्ताहिक भाग्यशाली राशी


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)