Lonavala Crime News : लोणावळा शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार (Crime News) करण्यात आले. यानंतर आरोपीने तिला सामसूम असलेल्या रस्त्याच्या कडेला टाकून दिलं. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस घटनेचा तपास करत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी 12 तासांत अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिलीये. तर इतर दोन आरोपी फरार असून या नराधमांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. मात्र या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, काही तासांनतर हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळली
अशीच एक संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील वडळी गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. काही तासांनतर अपहरण झालेली मुलगी अज्ञातस्थळी हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमानविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा अधिक शोध घेत आहेत. अनिल घोरपडे आपल्या कुटुंबासमवेत वडळी गावात वास्तव्यास आहेत. त्यांना एक 17 वर्षाची मुलगी असून 11 महिन्यांच्या कालखंडात दोन वेळा या कुटुंबासोबत ही घटना घडली. घराच्या अंगणातून मुलगी एकटी असताना तिचे अपहरण होते आणि अज्ञातस्थळी मुलगी हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून येते. या प्रकारामुळे कुटुंबीय भयभीत असून याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून या प्रकारामुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.
पिकअप वाहनाची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, एक गंभीर
भरधाव वेगात असलेल्या पिकअप वाहनाने उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने घडलेल्या अपघातात पिकअपमधील एक तरूण ठार झाला. तर पिकअप वाहनाचा चालक गंभीररित्या जखमी झाला. डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत कोहमारा येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ही घटना घडली. मृताचे नाव मनिष बोरकर (25) असे आहे. घटनेची नोंद डूग्गीपार पोलिसांनी घेतली आहे.
आणखी वाचा