Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन म्हणजेच राखीचा पवित्र सण, या पवित्र सणाची बहिणी वर्षभर वाट पाहत असतात. पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच श्रावण महिन्याला साजरा केला जातो. मात्र यंदा तिथीबाबत काही लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. जाणून घेऊया राखी बांधण्याची नेमकी तारीख कोणाती आणि शुभ मुहूर्त कोणता?


रक्षाबंधन कधी आहे? 11 की 12 ऑगस्टला?
हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.05 वाजता समाप्त होईल. पण प्रश्न पडतो की रक्षाबंधन हा सण कोणत्या दिवशी साजरा करावा? जाणून घेऊया शुभ दिवस?


रक्षाबंधन 2022 कधी आहे? तारीख आणि वेळ
श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. रक्षाबंधनासाठी दुपारनंतरचा काळ सर्वोत्तम मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार दुपारची वेळ राखी बांधण्यासाठी सर्वात योग्य असल्याचे सांगितले जाते. यासोबतच दुपारी 'भद्रा' काळ असेल तर ते शुभ मानले जात नाही. 11 ऑगस्ट 2022 रोजी, प्रदोष काळात भाद्रपुच्छच्या वेळी संध्याकाळी 5 वाजून 18 मिनिटे ते 6 वाजून 18 मिनिटे या दरम्यान रक्षासूत्र बांधू शकता. किंवा भद्राकाळ संपल्यानंतर तुम्ही रात्री 8 वाजून 54 मिनिटे ते 9 वाजून 49 मिनिटे या दरम्यान राखी बांधू शकता. पण परंपरेने सूर्यास्तानंतर राखी बांधली जात नाही. या कारणांमुळे 11 ऑगस्टला राखी बांधण्यापेक्षा 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी करणे उत्तम ठरेल.


 ...त्यामुळे 12 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरेल.
रक्षाबंधनासाठी प्रदोष काळचा मुहूर्त 11 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 08:54 ते 09:49 पर्यंत आहे. राखी बांधण्यासाठीही हा काळ योग्य असल्याचे सांगितले जाते. तर 12 ऑगस्टला सकाळी 7 वाजून 6 मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी असून, या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ही पौर्णिमा तिथी असेल. या दिवशी भद्राची सावली राहणार नाही. त्यामुळे 12 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :