Rahu Transit 2022 : मिथुन राशीच्या लोकांसाठी राहूचा राशी बदल महत्वाचा असणार आहे. 12 एप्रिल रोजी राहूची राशी बदलत आहे. कोणत्या स्थितीत राहुचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ परिणाम देणारे आहे आणि कोणत्या गोष्टी अशुभ आहेत जाणून घ्या. 


राहुच्या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांचा खर्च वाढणार आहे. राहु संक्रमणाचा ग्रह असल्यामुळे आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यावरील खर्च वाढू शकतो. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. एप्रिलपर्यंत राहूच्या प्रभावामुळे धनहानी होऊ शकते. खर्चात अचानक वाढ झाल्यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट ओढवेल.


कामाच्या ठिकाणी प्रत्येक कामात अडथळे येतील. कार्यालयात विरोधकांपासून सावध राहणे तुमच्यासाठी यावेळी खूप महत्वाचे असेल. व्यापारी वर्गाने प्रतिस्पर्ध्यावर बारीक नजर ठेवून काम करावे. ते तुमची काम करण्याची पद्धत अवलंबू शकतात. त्यामुळे तुम्हाला खूप नुकसान सहन करावे लागू शकते.


या महिन्यात कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर असाल. त्यामुळे मानसिक तणाव वाढेल. यावेळी तुम्ही जे काही काम किंवा उद्देश ठेवाल त्यात यश मिळवण्यासाठी राहु तुम्हाला मदत करेल. ऑफिसमध्ये तुमचा बॉस आणि सहकाऱ्यांशी सुसंवाद साधून काम करा, कारण राहु षड्यंत्र सारखी परिस्थिती निर्माण करू शकतो. त्‍यामुळे तुमच्‍या प्रतिमेवर खोलवर परिणाम होईल. तसेच प्रमोशनमध्‍ये अडथळे निर्माण होऊ शकतात.


उपाय : शनिवारी काळ्या उडदाचे दान केल्यास नकारात्मक परिस्थितींना सामोरे जाता येईल आणि समोरच्याचा राग कमी होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)


महत्वाच्या बातम्या