Kalyan Dombivali Municipal : कल्याण डोंबिवली  महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला म्हणजेच  केडीएमटीला आता स्मार्ट सिटीचे पाठबळ मिळालं आहे. स्मार्ट सिटी उपक्रमातून केडीएमटीच्या बसेसमध्ये  इंटीग्रेटेड ट्राफिक ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम आज पालिका आयुक्तांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली.  या प्रणालीमुळे  केडीएमटी स्मार्ट होण्याचा विश्वास पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.


सध्या रस्त्यावर धावणाऱ्या 40 बसेसमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. तर पुढील महिन्यात आणखी 50 बसेस केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार असून 125 बसेसमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. सध्या कल्याण पनवेल हा सर्वाधिक उत्पन्नाचा केडीएमटीचा मार्ग असून भविष्यात इतर मार्ग देखील अशाच प्रकारे फायद्यात चालतील अशा विश्वास देखील आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.


प्रवाशांना मिळणार स्मार्ट सुविधा


या अद्ययावत प्रणालीत बसचे वेळापत्रक आणि बस किती वेळात थांब्यावर पोहोचेल याची माहिती प्रवाशांना घरबसल्या मिळू शकणार आहे. शिवाय बस तिकीट बुकिंगसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बस कोणत्या मार्गावर चालत आहे? यासह कोणत्या थांब्यावर थांबली आहे हे सिस्टीमवर अपडेट राहणार आहे. त्यामुळे बसवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला शक्य होणार आहे. तर चालकांना केडीएमटीच्या स्लायडिंगला लागणाऱ्या बसेस देखील मार्गस्थ ठेवाव्या लागणार असल्याने प्रवाशांना केडीएमटीची सुविधा मिळू शकेल. याशिवाय बसमध्ये चालकाकडे कमांड एन्ड कंट्रोल स्टेशनला संपर्क साधण्याची तसेच प्रवाशांना सूचना देण्याची सुविधा देण्यात आली आहे. 


आतापर्यत प्रवाशांच्या मनातून हद्दपार झालेल्या केडीएमटीला पुन्हा एकदा प्रवाशांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न या प्रणालीद्वारे आता पालिकेकडून केला जातोय. नागरिकांना केडीएमटीच्या उत्तम सेवेचा लाभ घेता येईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या