Rahu Ketu Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, राहु-केतूला पापी ग्रह मानतात. अशी मान्यता आहे की, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु-केतु (Rahu-Ketu) असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटांवर संकटं येतात. तसेच, अनेक समस्या वाढतात. मात्र, प्रत्येक वेळी हे असंच घडेल हे सांगता येत नाही. अनेकदा राहु-केतूचं संक्रमण काही राशींच्या लोकांचं भाग्य देखील बदलू शकतं. नवीन वर्षात राहू-केतुचं संक्रमण होणार आहे. हे संक्रमण काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे.
राहु-केतु संक्रमण तिथी 2024
हिंदू पंचांगानुसार, राहू-केतू नवीन वर्ष 2025 मध्ये आपली चाल बदलणार आहे. राहु ग्रह पुढच्या वर्षी 18 मे 2025 रोजी कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तर, केतु ग्रह कन्यापासून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. याबरोबरच, या काळात 3 राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
राहु-केतुच्या संक्रमणाने या राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील. भावा-बहिणीच्या नात्यात प्रेम वाढेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही धार्मिक यात्रादेखील करु शकता.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
राहु-केतुच्या संक्रमणाने वृश्चिक राशीला चांगलाच लाभ होणार आहे. या काळात जे तरुण विवाहाचे आहेत त्यांना लवकरच चांगले स्थळ येईल. तुमच्या कुटुंबात धन-संपत्तीशी संबंधित तुम्हाला चांगला लाभ होईल. तसेच, घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं.
मिथुन रास (Gemini Horoscope)
राहु-केतुच्या संक्रमणाने मिथुन राशीच्या लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :