Rahu Gochar 2024 : राहू हा मायावी ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात राहूच्या चालीला विशेष महत्त्व आहे. राहुने गेल्या वर्षी आपला मार्ग बदलला आणि तो सध्या मीन राशीत स्थित आहे. या संपूर्ण वर्षात राहू (Rahu) फक्त मीन राशीत राहणार आहे, याच राशीत तो आपली चाल बदलत राहील. राहूची उलटी चाल काही राशींवर भारी पडू शकते, तर इतर राशींना राहूच्या चालीचा मोठा फायदा मिळू शकतो.

Continues below advertisement


राहू मे 2025 मध्ये उलट चाल चालून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. तोपर्यंतच्या 362 दिवसांच्या काळात राहू कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) शुभ ठरेल? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


राहूचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानलं जातं. या काळात तुमच्या आयुष्यात फक्त आनंदी आनंद दिसेल. तुमच्या करिअरमधील प्रत्येक टार्गेट पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्याकडे अशा जागेवरुन पैसा येईल जिथून तुम्ही विचारही केला नसेल. या काळात तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या जीवनात रोमान्सही असेल.


वृश्चिक रास (Scorpio)


राहूची बदलती चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानली जाते. तुम्हाला या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायात केलेल्या नियोजनामुळे चांगले गुंतवणूकदार आकर्षित होऊ शकतात. तुम्हाला नशीब पूर्ण साथ देईल. तुमच्या कुटुंबातही शांतता राहील आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी राहूचं संक्रमण फलदायी मानलं जातं. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ मानला जात असून तुमच्या कुटुंबात चांगली धनसंपत्ती राहील. त्याच वेळी, या काळात कुठेतरी प्रवासाची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shukra Gochar 2024 : अवघ्या 18 दिवसांत पालटणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार, व्यवसायही गाठणार नवी उंची