Rahu-Budh Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार, 2025 साठी नवीन वर्ष फार चांगलं ठरणार आहे. याचा परिणाम देशभरात पाहायला मिळतो. 2025 च्या नवीन वर्षात राहु आणि बुध ग्रहाची युती होणार आहे.
खरंतर, राहु आधीपासूनच मीन राशीत विराजमान आहे. तर, बुध ग्रह 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजून 46 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांची मीन राशीत युती होणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. मात्र, यापैकी 3 राशी अशा आहेत ज्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तसेच, अचानक धनलाभ देखील होईल. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
बुध आणि राहु ग्रहाची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी फार लकी ठरु शकते. या राशीच्या अकराव्या चरणात युती होणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, बौद्धिक क्षमतेचा विकास होईल. तसेच, विदेशी यात्रेचा योग आहे. तसेच, तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
2025 मध्ये बुध आणि राहु ग्रहाची युती पाचव्या चरणात होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ होऊ शकतो. तसेच, शेअर मार्केटमध्ये चांगला लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. या काळात उत्पन्नाचे नवे स्त्रोतही तुमच्यासमोर खुले होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
राहु आणि बुध ग्रहाची युती तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल ठरु शकतो. या राशीच्या सहाव्या चरणात युती होणार आहे. तसेच, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळू शकतो. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे सुरु असलेले आजार या काळात संपतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :