Mercury Transit In Aquarius : ग्रहांचा राजकुमार बुधाने 20 फेब्रुवारीलाच कुंभ राशीत प्रवेश केला आहे. अशा वेळी, कुंभ राशीत झालेलं बुधाचं (Budh) मार्गक्रमण अनेक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करेल. एवढंच नाही तर, कुंभ राशीत शनि (Shani) आधीच स्थित आहे आणि याशिवाय या राशीमध्ये सूर्य (Surya) ग्रह देखील आहे


कुंभ राशीत शनि आणि बुध एकत्र आल्याने शुभ संयोग बनला आहे, कारण दोन्ही अनुकूल ग्रह आहेत आणि त्यामुळे हा योग काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यासोबतच बुधाचा सूर्याशी संयोग होऊन बुधादित्य योग तयार झाला आहे. त्यामुळे, बुध कुंभ राशीत गेल्याने दुहेरी राजयोग तयार झाला आहे. या दोन योगांमुळे काही राशींना भरपूर फायदे मिळू शकतात. या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


बुधाच्या मार्गक्रमणामुळे मेष राशीच्या अकराव्या घरात शुभ राजयोग तयार होत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना अपार संपत्ती प्राप्त होईल. करिअरच्या क्षेत्रातही भरीव यश मिळू शकतं. परदेशातून नोकरीची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात समाधानी राहू शकता. यासोबतच तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या बौद्धिक कौशल्याने इतरांना प्रभावित कराल. आर्थिक लाभासोबतच व्यवसायात तुम्हाला मोठं यश मिळेल.भागीदारीत केलेल्या व्यवसायात तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील.


तूळ रास (Libra)


या राशीच्या पाचव्या घरात दुहेरी राजयोग तयार होत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांचा कल अध्यात्माकडे असेल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हाल. करिअरबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला कामाच्या संदर्भात थोडा प्रवास करावा लागू शकतो. पण भविष्यात तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला बढती आणि प्रोत्साहन मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. शेअर बाजारातून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आरोग्यही चांगलं राहील. तुम्ही जोश आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. वैवाहिक जीवनातही आनंद राहील.


कुंभ रास (Aquarius)


या राशीच्या चढत्या घरात दुहेरी राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता आणि सट्ट्यात तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता. तुमच्या मुलांना सततच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. करिअरमध्ये थोडी काळजी घेण्याची गरज आहे, पण व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप फायदा होणार आहे. शेअर बाजारात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani 2024 : मार्चमध्ये शनि आणि सूर्याच्या स्थितीत होणार बदल; 'या' 5 राशींवर पडणार पैशांचा पाऊस, प्रगतीचे मार्ग होणार खुले